इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या आर्थिक चणचणीचा फटका आता चहा मिळण्यावरही व्हायला सुरुवात झालेली आहे. पाकिस्तानी नागरिकांना एक कप चहाही (Pakistan Tea Crisis) मिळणं अवघड होऊन बसलंय. पाकिस्तानकडे परदेशातील वस्तू आयात करण्यासाठी पैसे नाहीत. तर दुसरीकडं या परिस्थितीमुळं पाकिस्तानच्या बंदरावर 250 विदेशी कंटेनेर अडकलेले आहेत. जोपर्यंत पाकिस्तान (Pakistan Crisis) डॉलर्स यासाठी मोजणार नाही, तोपर्यंत या कंटेनर्सवर अडकून पडलेली चहा पावडर (Tea Powder) त्यांना मिळणं अवघड आहे. एका बाजूला चहा पावडर अशी कंटेनरमध्ये अडकलेली असताना, देशातील चहाच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. पाकिस्तानमध्ये काळी चहा पावडर सध्या 1600 रुपये प्रति किलोवोर जाऊन पोहचली आहे. 15 दिवसांपूर्वी याच एका किलोची किंमत 1100 रुपये इतकी होती.
चहाच्या किंमती भिडल्या गगनाला
चहा पावडर घेऊन आलेले कंटेनर अद्यापही बंदरात अडकून पडले असल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनीच दिलेली आहे. हे केंटेनर डिसेंबर 2022 पासून या ठिकाणी थांबलेले आहेत. एका दुकानदाराने सांगितले की 900 रुपयांच्या चहा पावडची किंमत आता 1500 रुपयांवर पोहचली आहे. आगामी काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
2500 रुपये प्रति किलो होणार चहा
आयात करण्यासाठी डॉलर्सच उपलब्ध नसल्याने मार्चमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. पाकिस्तानी स्टेट बँक या आयातीला विलंब करत असल्याचंही सांगण्यात येतंय. आता 180 दिवस अडकून राहिलेल्या कंटनेरमधील चहा किती किमतीला मिळेल याबाबतही अनिश्चितता आहे. 6 महिन्यांत डॉलर्सचे भाव काय असतील यावरुनही नवं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या सगळ्या अडचणीत कंटेनर उघडले नाहीत, डॉलरच्या किमती वाढल्या तर चहा 2500 रुपये किलोनीही मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. पाकिस्तान चहा केनियातून आयात करतो. दरवर्षी 50 कोटी डॉलर्सचा चहा आयात करण्यात येतो. पंतप्रधान शहबाज खान देशोदेशी आर्थिक मदतीची भीक मागत आहेत. मात्र अद्याप त्यांना याबाबत यश मिळालेलं नाही.