मॉस्को- बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको (Alexander Lukashenko) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकृती खालावल्यानं त्यांना तातडीनं मॉस्कोच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकतृती गंभीर असल्याचं आता सांगण्यात येतंय. बेलारुसचे विरोधी पक्षनेते वालेरी त्सेपल्को यांनी ही माहिती दिलीय. पुतिन यांच्याशी बंद दाराआड केलेल्या चर्चेनंतर अलेक्झांडर लुकाशेंको यांना मॉस्कोच्या सेंट्र क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. अलेक्झांडर लुकाशेंको हे पुतिन यांचे नीकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येतं. युक्रेनवर झालेल्या हल्ल्याचं त्यांनी जोरदार समर्थन केलं होतं.
[read_also content=”पाकिस्तानची आता नॅार्वेवर नजर! देशासाठी ठरतोय सर्वात मोठा धोका, नॉर्वे पोलिसांच्या अहवालात मोठा खुलासा https://www.navarashtra.com/world/police-report-reveal-pakistan-can-be-dangerous-to-norway-nrps-405981.html”]
बेलारुसचे विरोधी पक्षनेते त्सेपल्को यांनी शनिवारी एक ट्विट करत याची माहिती दिलीय. त्यात प्राथमिक माहितीनुसार, लुकाशेंगो यांनी पुतिन यांची बंद खोलीत चर्चा केली. त्यानंतर त्यांना मॉस्कोच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं त्यांनी लिहिलंय. सध्य़ा त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीत उपचार सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलंय. लुकाशेंगो यांचं रक्त स्वच्छ करण्यात येत असल्याचंही या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलंय. सध्या लुकाशेंगो यांची परिस्थिती त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याइतपत नसल्याचंही लिहिण्यात आलंय.
वालेरी यांनी हेही लिहिलं आहे. की लुाशेंगो यांना क्रेमलिनकडून विष देण्यात आल्याचा संशय आहे. सध्या बेलारुसी हुकुमशाहांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात येतायेत, हा दिखावा आहे. कुणाला संशय येऊ नये यासाठी हे करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. गेल्या काही काळापासून अलेक्झांडर लुकाशेंको यांच्या प्रकृतीविषयी अनेक अफवा पसरल्या होत्या. या महिन्याच्या सुरुवातीला मॉस्कोतील व्हिक्टरी परेडनंततर ते पुतिन यांच्या भेटीला गेले होते. त्यांनी पुतिन यांच्यासोबत दुपारी भोजनही केलं नसल्याचं सांगण्यात येतंय.