भारत अन् चीनशी नीट वागायचं! टॅरिफ वाढीवरून पुतिन यांनी अमेरिकेला सुनावलं, म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russian President Putin on US : मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांचे एक खळबळजनक विधान समोर आले आहे. पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि चीनवरुन सुनावले आहे. अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर टॅरिफ लादले आहे. अमेरिकेन भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे २५% कर लादला आहे. तसेच २५% दंडही लादला आहे. यामुळे पुतिन यांनी यावरुन अमेरिकेला खडे बोल लगावले आहे.
काय म्हणाले पुतिन?
त्यांनी म्हटले आहे की, भारत आणि चीन हे महासत्ता देश आहे. या देशांवर आर्थिक दबाव टाकला जाऊ शकत नाही. यामुळे राष्ट्रीय नेतृत्व कमकुवत होऊ शकते. पुतिन यांचे हे विधान शांघाय सहकार्य संघटना (SCO) परिषदेतून परतल्यानंतर आले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, वसाहतवादाचा काळा गेला आहे, यामुळे अमेरिका भारत आणि चीन यांसारख्या महासत्ता देशांशी अशा स्वरात बोलू शकत नाहीत.
1️⃣🔥🇷🇺 ‘YOU CANNOT TALK TO INDIA OR CHINA LIKE THAT:’ Putin on economic pressure against partners pic.twitter.com/FRvmLG2DIv
— Sputnik India (@Sputnik_India) September 3, 2025
पुतिन यांनी म्हटले आहे की, अमेरिका जगाातील मोठ्या देशांना टॅरिफ लादून आणि व्यापारी निर्बंधाचा वापर करुन त्यांच्या पुढे झुकण्यास मजबूर करत आहेत. त्यांनी म्हटले की, “इतिसाहात भारत आणि चीनने अनेक समस्यांचा सामान करुन आपले नेतृत्व प्रभावी केले आहे. जागतिक स्तरावर स्वत:ला सिद्ध केले आहे. यामुळे अशा नेतृत्वाला कमकुवत करणे अयोग्य” असल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे.
पुतिन यांनी सांगितले की, भारत आणि चीनची अर्थव्यवस्था खूप मोठी आणि अत्यंत चांगली आहे. या देशांनी स्वत: कायदे आणि राजकीय व्यवस्था कठोर परिश्रमातून उभी केली आहे. यामुळे या देशांशी अशा स्वरात बोलणे हे अयोग्य आहे.
पुतिन यांनी सांगितले की, भारत आणि चीनला टॅरिफची धमकी देऊन धमकावले जात आहे. यामुळे या राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांनी कमजोर होऊन चालणार नाही. यामुळे पुतिन यांनी ट्रम्प यांनी इशार दिला आहे की, या देशांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते. पण यासाठी पुन्हा राजकीय संवाद सुरु करण्याची गरज आहे.
याच वेळी ट्रम्प यांनी आणखी एक दावा केला आहे की, भारताने शून्य टॅरिफची ऑफर दिली होती. पण ही ऑफर त्यांनी भारतावर टॅरिफ लादल्यानंतर मिळाली असेही त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत हा अमेरिकेवर सर्वाधिक टॅरिफ लावणार देश आहे. जर त्यांनी भारतावरही तितकेच टॅरिफ लादले नसते, तर भारताने अशी ऑफर कधीच दिली नसती.
ट्रम्पच्या उलट्या बोंबा! म्हणाले; भारत सगळ्यात जास्त टॅरीफ लावणारा देश, म्हणूनच आम्हीही…