Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Taliban Deal : पाकिस्तानचे दाबे दणाणले! रशिया-तालिबानमध्ये सर्वात मोठा संरक्षण करार, जगभरात खळबळ

Russia Taliban Deal : रशिया आणि तालिबानमध्ये मोठा संरक्षण करार करण्यात आला आहे. या करारामुळे दक्षिण आशियातील समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, हा करार पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणारा मानला जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2026 | 12:12 PM
Russia Taliban Defence Deal

Russia Taliban Defence Deal

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानला मोठा धक्का
  • रशिया तालिबानमध्ये मोठा संरक्षण करार
  • काय आहे जाणून घ्या?
Russia Taliban Deal : काबूल/मॉस्को : पाकिस्तान(Pakistan) साठी मोठी धक्कादायक बातमी आहे. रशिया आणि अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमध्ये मोठा संरक्षण करार करण्यात आला आहे. या करारानुसार, रशिया तालिबानला अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा पुरवणार आहे. या करारामुळे दक्षिण आशियातील समीकरणात मोठी खळबळ उडाली आहे. हा करार पाकिस्तानसाठी धक्कादायक मानला जात आहे.

Ajit Doval Moscow Visit : ‘दहशतवादाविरोधात दुहेरी मापदंड खपवून घेणार नाही’ ; मॉस्कोतून अजित डोवाल यांची मोठी घोषणा

नुकतेच रशियामध्ये उच्चस्तरीय संरक्षण बैठकीचे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रशियन सुरक्षा परिषद आणि तालिबानचे संरक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण संरक्षण करार करण्यात आला. यामुळे दोन्ही देशांतील लष्करी सहकार्याला बळकटी मिळाली आहे. या कराराअंतर्गत शस्त्रास्त्रच नाही, तर रशिया तालिबान सैन्याला विशेष लष्करी प्रशिक्षणही देणार आहे. हवाई संरक्षण प्रणालीसोबतच जमिनीवरील कारवाईसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध शस्त्रांचा पुरवठा देखील तालिबानला केला जाणार आहे.

पाकिस्तानची झोप उडणार

या करारामुळे पाकिस्तानची मात्र झोप उडाली आहे. पाकिस्तान आणि अफगाण सीमेजवळ सतत हवाई कारवाया सुरु आहे. अशा परिस्थिती रशियातची हवाई संरक्षण प्रणाली तालिबानला मिळाल्यास पाकिस्तानी सैन्याना अफगाण सीमेत घुसून हल्ले करणे अशक्य होईल. हे पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेला मोठे आव्हान देणारे ठरेल.

तालिबानला ही मिळणार S-400 ?

मिळालेल्या माहितीनुसार, रशिया (Russia) तालिबान सैन्याला S-400 ही शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणा देण्यावर चर्चा करत आहे. हीच यंत्रणाही भारताकडे आहे. या यंत्रणेच्या मदतीने भारताने ३१४ किलोमीटवर पाकिस्तानचे अवाक्स विमान हाणून पाडले होते.

काय आहे पुतिन यांची खेळी?

सध्या अफगाणिस्तान तालिबान (Taliban) आणि रशियाच्या या कराराने केवळ पाकिस्तानचे नव्हे, तर दक्षिण आशियातील इतर देशांमध्ये देखील खळबळ उडाली आहे. यापूर्वी २०२१ मध्ये रशियाने काबूलमध्ये आपला दूतावास खुला केला होता. तसेच तेल, गॅस आणि गव्हाच्या पुरवठ्यावरही दोन्ही देशांमध्ये स्वंतत्र करार करण्यात आला आहे.

रशियाने अद्याप तालिबानला अधिकृत मान्यता दिलेली नाही, परंतु जवळीक राखली आहे. पुतिन यांनी स्पष्ट केले आहे की, तालिबानच्या नेतृत्त्वाशी थेट संवादल्याशिवाय प्रदेशात टिकून राहणे कोणालाही शक्य नाही. यामुळेच रशियाने हा करार करण्यात आला असावा असे तज्ज्ञांचे मत आहे.

सोन्याचं नाणं कमी पडलं? आता थेट २५० डॉलर्सच्या नोटवर झळकणार Donald Trump; अमेरिकन राजकारणात पेटला वाद

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशिया तालिबानमध्ये कोणता करार करण्यात आला?

    Ans: रशिया तालिबानमध्ये मोठा संरक्षण करार करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत रशिया तालिबान सैन्याला हवाई संरक्षण प्रणाली आणि त्याचे प्रशिक्षणही देणार आहे.

  • Que: रशिया-तालिबान कराराने पाकिस्तानची झोप का उडवली?

    Ans: रशिया तालिबानला हवाई संरक्षण प्रणाली देऊ करणार आहे. असे झाल्यास पाक सैन्याला अफगाण सीमेत घुसून हवाई हल्ले करणे शक्य जाईल. ही बाब पाकिस्तानच्या संरक्षणासाठी धोकादायक मानली जात आहे.

  • Que: तालिबानला रशियाकडून कोणती संरक्षण प्रणाली मिळणार आहे?

    Ans: रशिया तालिबान सैन्याला S-400 ही शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणा देण्यावर विचार करत आहे.

Web Title: Russia taliban biggest defence deal pakistan tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Afghanistan taliban
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Crisis: सत्य लिहिण्याची हीच का शिक्षा? बांगलादेशात 4 पत्रकारांवर अंदाधुंद गोळीबार; खुलना शहरात प्रचंड तणाव
1

Bangladesh Crisis: सत्य लिहिण्याची हीच का शिक्षा? बांगलादेशात 4 पत्रकारांवर अंदाधुंद गोळीबार; खुलना शहरात प्रचंड तणाव

ChinaBiotech: वटवाघुळ झाले आता चीन माकडांच्या मागे! एकाची किंमत तब्बल ३० लाख रुपये; प्रयोगशाळेत घडतंय काहीतरी धक्कादायक?
2

ChinaBiotech: वटवाघुळ झाले आता चीन माकडांच्या मागे! एकाची किंमत तब्बल ३० लाख रुपये; प्रयोगशाळेत घडतंय काहीतरी धक्कादायक?

BabElMandeb: ‘अश्रूंचे द्वार’ जागतिक अर्थव्यवस्थेला रडवणार? ‘बाब अल-मंदेब’ नाकेबंदीच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाच्या बाजारात भूकंप
3

BabElMandeb: ‘अश्रूंचे द्वार’ जागतिक अर्थव्यवस्थेला रडवणार? ‘बाब अल-मंदेब’ नाकेबंदीच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाच्या बाजारात भूकंप

Saudi-Houthi Attacks : हुथींच्या सौदीवरील हल्ल्यामुळे शाहबाज-मुनीर चिंतेत; पाकिस्तानही युद्धात मारणार उडी?
4

Saudi-Houthi Attacks : हुथींच्या सौदीवरील हल्ल्यामुळे शाहबाज-मुनीर चिंतेत; पाकिस्तानही युद्धात मारणार उडी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.