सोन्याचं नाणं कमी पडलं? आता थेट २५० डॉलर्सच्या नोटवर झळकणार Donald Trump; अमेरिकन राजकारणात पेटला वाद (फोटो सौजन्य: एआय)
Donald Trump यांच्या अहंकाराचा नवा पायंडा; आधी डॉलर, अन् आता थेट पासपोर्टवर झळकणार फोटो
मिळालेल्या माहितीनुसार, साउथ कॅरिलिनो राज्याच्या रिपब्लिकन खासदार जो विल्सन यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. याला ‘डोनाल्ड ट्रम्प $250 बिल कायदा’ असे नाव दिले आहे. या प्रस्तावानुसार, ट्रम्प यांचा चेहरा असणारी २५० डॉलर्सची नोट छापण्याचे आदेश सरकारी विभागाला देण्यात येतील.
या नोटची डिझाईन ट्रम्प यांच्या बोलून तयार करण्यात आली आहे. नोटच्या मध्यभागी ट्रम्प यांचा चेहरा असेल. त्यावर ट्रम्प आणि अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांच्या स्वाक्षऱ्या राहतील. तसेच अमेरिकन झेंड्यांचा रंगही या नोटमध्ये वापरण्यात येईल. या नोटची डिझाईन इयान अलेक्झांडर नावाच्या कलाकारने तयार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत नोटवर कोणाचा फोटो छापण्यासाठी एक कायदा तयार करण्यात आला आहे. या १८६६ च्या जुन्या कायद्यानुसार, एखाद्या बड्या राजकीय व्यक्तीचे निधन झाले, तरच त्या राजकीय व्यक्तीचा चेहरा नोटवर छापता येते. व्यक्ती जिवंत असाताना चेहरा नोटवर छापण्यास सक्त मनाई आहे. हा नवा प्रस्तव मंजूर करण्यासाठी अमेरिकन संसदेला नवी कायदा संमत करावा लागले.
सध्या नोटचे डिझाईन छापण्यासाठी सरकारी छपाई विभागावर दबाव टाकला जात असल्याचा दावा केला जात आहे. ज्यामुळे मोठा वाद पेटला आहे. हा प्रस्ताव अव्यवहार्य असल्याचे छपाई विभागाच्या प्रमुखांनी म्हटले होते. परंतु यामुळे त्यांची लगेच बदली करण्यात आल्याने वाद आणखी पेटला आहे.
विशेष म्हणजे, असा निर्णय घेण्याची ही ट्रम्प यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांचा चेहरा असलेले सोन्याचं नाणं काढण्याची आणि पासपोर्टवर त्यांच्या फोटोची घोषणाही केली होती. आता ट्रम्प यांना 250 डॉलर्सच्या नोटेवरही आपला चेहरा चिटकवयाचा आहे. अमेरिकेच्या स्थापनेला जुलै २०२६ मध्ये २५० वर्षे पूर्ण होत आहे, याचे औचित्य साधून हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या अट्टहासामुळे अमेरिकन राजकारणात मोठा वाद पेटला आहे.
VIRAL : Donald Trump सारख्या दिसणाऱ्या म्हशीवरुन इराणचा खोचक टोला; सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत
Ans: जुलै २०२६ मध्ये अमेरिकेच्या स्थापनेला २५० वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने साउथ कॅरिलिनो राज्याच्या रिपब्लिकन खासदार जो विल्सन यांनी 'डोनाल्ड ट्रम्प $250 बिल कायदा'चा प्रस्ताव मांडला आहे. ज्याअंतर्गत २५० च्या नोटेवर ट्रम्प यांचा फोटो छापण्याची मागणी केली आहे.
Ans: या नोटची डिझाईन ट्रम्प यांच्या बोलून तयार करण्यात आली आहे. नोटच्या मध्यभागी ट्रम्प यांचा चेहरा असेल. त्यावर ट्रम्प आणि अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांच्या स्वाक्षऱ्या राहतील. तसेच अमेरिकन झेंड्यांचा रंगही या नोटमध्ये वापरण्यात येईल.
Ans: या नोटची डिझाईन इयान अलेक्झांडर नावाच्या कलाकारने तयार केली आहे.






