फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: ब्राझीलमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. ब्राझीलच्या ॲमेझॉन रेनेफॉरेस्टमधील सर्वात मोठे शहर असलेल्या मनौसमधील नदी बंदराची पाण्याची पातळी कमी झाली आहे. 122 वर्षांतील ही सर्वात कमी पाण्याची पातळी आहे. यामुळे भूजल आणि पर्यावरण शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. नंदी बंदरातील पाण्याची पातळी 1902 नंतर प्रथमच सर्वात खालची पातळी बंदराने गाठली आहे. ब्राझीलमधील भीषण दुष्काळामुळे येथील जलवाहिन्या उद्धवस्त झाल्या आहेत. यामुळे या प्रदेशाची धान्याची निर्यात आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक विस्कळीत झालेली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ब्राझीलमध्ये सरारीपेक्षा कमी पाऊस यावेळी पडला असल्याने हे मोठ्या दुष्काळाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. यावेळी ब्राझीमध्ये पावसाळ्यातही कमी पाऊस नोंदवला गेला. गेल्या वर्षभरापासून ॲमेझॉन आणि दक्षिण अमेरिकेतील बहुतांश भाग त्रस्त आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामान बदल हे मुख्य कारण आहे. शास्त्रज्ञांचा म्हटले आहे की, असा अंदाज आहे की ॲमेझॉन प्रदेश 2026 पर्यंत आर्द्रतेची पातळी पूर्णपणे पुनर्प्राप्त करू शकणार नाही.
दोन आठवड्यात पाण्याची पातळी आणखी खाली येऊ शकते
पाण्याची पातळी कमी झाल्याने नद्यांवर अवलंबून असलेले लोक अन्न, पाणी, औषधाविना लोकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तसेच अमेझोनेस राज्यातील किमान 62 मगरपालिका आपत्कालीन स्थितीत आहेत. त्यामुळे येखील सरकार अधिकच सतर्क आहे. राज्य संरक्षण कॉर्प्सच्या म्हणण्यानुसार, दुष्काळामुळे अर्धा दशलक्षहून अदिक लोक प्रभाविक झाले आहेत. येत्या एक-दोन आठवड्यात नदीच्या पातळीत आणखी घट होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. मनौस बंदराने शुक्रवारी रिओ निग्रो नदीचे मोजमाप केले जे 12.66 मीटर भरले. गेल्या वर्षी नोंदवलेल्या नीचांकी पातळीला मागे टाकले आणि अजूनही वेगाने घसरत आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
1950 च्या दशकानंतरचा सर्वात भीषण दुष्काळ
राष्ट्रीय देखरेख आपत्ती दलाने सांगितले की, ब्राझीलमध्ये 1950 च्या दशकानंतरचा हा सर्वात भीषण दुष्काळ आहे. या दुष्काळामुळे ब्राझीलमधील विजेचा मुख्य स्त्रोत असलेल्या जलविद्युत प्रकल्पांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे वीज वाचवण्यासाठी डोलाइट सेव्हिंग टाइम परत सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अति हवामान आणि कोरडेपणा दक्षिण अमेरिकेच्या अनेक भागांवर परिणाम करत असून, पॅराग्वे नदी देखील सर्वात खालच्या पातळीवर आहे. ही नदी ब्राझीलमध्ये सुरू होते आणि पॅराग्वे आणि अर्जेंटिनामधून अटलांटिकमध्ये वाहते.