फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: सध्या इराण-इस्त्रायल यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे पश्चिम आशियामध्ये युद्धाची भिती वाढत आहे. दरम्यान इस्त्रायलने इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांंचे उत्तर देत इराणवर बेरूतमध्ये, गाझामध्ये हल्ले केले. मात्र, यादरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी इस्त्रायलला इराणला संपुष्टात आणायचे असेल तर आधी इराणच्या अणुबॉम्बच्या ठिकाणांना उडवून टाकण्याच सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणच्या हल्ल्याचे प्रत्त्युत्तर म्हणून त्यांच्या आण्विक केद्रांवर हल्ले इस्त्रायलने केले पाहिजेत.
मीडिया रिपोर्टनुसार, नॉर्थ कॅरोलिना येते प्रचार रॅलीदरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना माजी अध्यक्षांनी इराणच्या अणु क्षेत्रांवर लक्ष्य करण्याच्या शक्यतेबद्दल प्रश्न विचारला होता. माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणबद्दल तुमचे काय मत आहे, तुम्ही इराणच्या आण्विक हल्ल्यांची वाट पाहत आहात का असा प्रश्न त्यांनी जो बायडेन यांना केला होता. तर, या प्रश्नाच्या उत्तरात बायडेन यांनी त्यांच्याकडे याचे उत्तर नाही असे म्हटले होते.
इराणचे अण्वस्त्रे हा सर्वात मोठा धोका
इराणचे अण्वस्त्रे हा सर्वात मोठा धोका असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले असून त्यांनी बायडेन यांनी तुम्ही चुकीचे करत आहात असे म्हटले. त्यांनी सांगितले की, आपल्यासाठी इराणच्या आण्विक क्षेत्रांना नष्ट करणे महत्त्वाचे आहे नाहीतर याचा सर्वात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. बायडेन यांनी अण्वस्त्रांच्या हल्ल्यांचे उघडपणे समर्थन केले पाहिजे. त्यामुळे मी इस्त्रायला सल्ला देतो की, त्यांनी आधी इराणच्या न्यूक्लिअर बॉम्बच्या ठिकाणांना उद्धवस्त करावे.
लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकामांवर इस्त्रायचे हल्ले सुरूच
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. इस्त्रायल हिजबुल्लाच्या प्रत्येक तळावर हल्ला करताना दिसत आहे. ड्रोनपासून क्षेपणास्त्रांपर्यंत हल्ले होत आहेत. हिजबुल्लाचा नवा प्रमुख आणि अनेक बडे दहशतवादी मारल्यानंतरही त्याचे हल्ले थांबत नाहीत. हिजबुल्लाला पूर्णपणे नेस्तनाबूत केल्यानंतरच आपला मृत्यू होईल, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे.
दक्षिण केरियाचे अस्तित्त्व मिटवण्यात येईल
याशिवाय,सध्या रशिया-युक्रेमपासून ते इस्त्रायल-हमास, इस्त्रायल-हिजहुल्ला, इस्त्राय-हुथी, आणि इस्त्रायल-इराणपर्यंत संपूर्ण मध्य आशियामध्ये युद्धाची धग वाढत आहे. याचवेळी उत्तर कोरियाच्या हुकूमशहा किम जोंग यांनी दक्षिण कोरियावर न्यूक्लिअर ॲटॅक करू असे म्हटले आहे. तसेच अमेरिकेलाही किम जोंग ने इशारा दिला आहे. यामुळे तिसरे जागतिक महायुद्ध सुरू होण्याची भिती संपूर्ण जगभर वाढली आहे.