पुण्यातून गुन्हेगारीची एक घटना समोर आली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पुण्यातील सनशाईन स्पा सेंटरवर छापा टाकत हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये धाडीत पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कशी करण्यात आली कारवाई?
मिळालेल्या माहिती नुसार, या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. ‘मसाज पार्लर’च्या नावाखाली अनैतिक धंदा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत “SUN SHINE SPA” या स्पा सेंटरवर कारवाई केली. चंदननगर पोलिसांनी संदीप चव्हाण (मुख्य आरोपी), रोहित शिंदे, मॅनेजर गोपाळर श्वेता उर्फ स्वाती सूर्यवंशी (स्पा व्यवस्थापक) यांना अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींवर PITA कायद्यानुसार (कलम 3, 4, 5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा नवा प्रयोग; ‘या’ टोळ्याकडून काळ्या पैशाचा हिशेब घेतला जाणार
पुण्यातील टोळ्यांच्या ”डोळ्यांत” धडकी भरवणारी कारवाई पुणे पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना जेरबंद करण्याबरोबरच त्यांच्या बेकायदेशीर साम्राज्यावर आर्थिक ऑडिटची कात्री लावली आहे. आलिशान गाड्या, उंच उंच टॉवर, तर त्यामधील फ्लॅट्स आणि कोट्यवधींच्या मालमत्ता वैध स्रोतांशिवाय जमवलेली ही माया आता तपासणीच्या भोवऱ्यात सापडली आहे. “गुन्हेगार जेरबंद होतीलच; पण त्यांच्या काळ्या पैशाचाही हिशेब घेतला जाईल” अशा ठाम भूमिकेतून पोलिसांनी सुरू केलेल्या मोहीमीने आश्वासक कारवाईचा एक विश्वास पुणेकरांच्या मनात निर्माण झाला आहे.
पुणे शहरातील नव्याने उदयास आलेल्या टोळ्या तसेच प्रमुख टोळ्यांवर आणि त्यांच्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलिस सातत्याने प्रयत्न करत आहेत. पण, गुन्हेगारी काही नियत्रंणात येत नसल्याचे वास्तव आहे. बेफाम झालेल्या या गुन्हेगारांनी सर्व सामान्यांवर देखील धाक बसवत त्यांना किरकोळ कारणावरून मारहाण सुरू केली. मोक्का, एमपीडीए तसेच खून व खूनाचे प्रयत्न, दरोडा, खंडणी यासारख्या गुन्ह्यातून हे गुन्हेगार सहीसलामत जामीनावर बाहेर येऊन पुन्हा गुन्हेगारी जगतात आपला पाय रोवत असल्याचे वास्तव आहे.
काळ्या पैशांद्वारे गुन्ह्यांना प्रोत्साहन
गुन्हेगारी टोळ्यांच्या हाती मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आला. त्यातूनच मग टोळ्यांचे साम्राज्य उभे राहिले. टोळ्यांकडे ना कोणता वैध व्यवसाय, ना स्थिर उत्पन्नाचे साधन; तरीही त्यांच्याकडे आलिशान गाड्या, मोठमोठ्या बंगल्यांसह अनेक मालमत्ता, अशा संशयास्पद संपत्तीची माहिती आहे. तीच शोधण्यासाठी पोलिसांनी आता आर्थिक तपासणी यंत्रणा आणि पुणे पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे.
Akola Crime: अकोल्यात सावत्र बापाचा नराधम कृत्य; पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत