Brazil News Marathi : ब्राझीलिया : सध्या अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाने संपूर्ण जग हादरले आहे. याचा फटका भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा यांसारख्या मोठ्या देशांना बसला आहे. तसेच याचा ब्राझीलवरही परिणाम झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ब्राझीलवर सर्वाधिक म्हणजेच ५०% कर लागू केले आहे. यामुळे ब्राझीलमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांच्या ब्राझीवरील टॅरिफला (Tarrif) तीव्र विरोध केला आहे. तसेच त्यांनी जागतिक व्यापार (World Trade Organization) संघटनेकडे समस्या मांडण्यावर विचार करत असल्याचे म्हटले आहे. याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलला वाटाघाटी करण्याची ऑफरही दिली आहे. परंतु यावर ब्राझीलचे पंतप्रधान लुला दा सिल्वा यांनी स्पष्ट नकार दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं पितळ पडलं उघडं; रशियाशी व्यापारावर प्रश्न विचारताच उडाला चेहऱ्याचा रंग
अमेरिका आणि ब्राझीलमधील वादावर देखील त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. उलट त्यांनी आधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या प्रथम चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. ब्राझीलच्या पंतप्रधानांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे, त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोणताही थेट संवाद साधायचा नाही हे स्पष्ट केले आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ब्राझीलच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी म्हटले होते की, ‘मी ट्रम्पशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही, त्यांच्याशी माझी बोलण्याची इच्छा नाही. पण मी त्यांना COP मध्ये आमंत्रित करण्याशीठी फोन करेल, मला केवळ हवामान मुद्यावर त्यांचे मत जाणून घ्यायचे आहे. याउलट मी पंतप्रधान मोदींना आणि शी जिनपिंग यांना फोन करेन असे त्यांनी म्हटले आहे.
याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ज ट्रम्प यांच्या विधानावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष सिल्वा टॅरिफवर वाटाघाटीसाठी कधीही फोन करु शकतात. त्यांची जेव्हाही माझ्या बोलायची इचछा होईल मी त्यावर चर्चा करेन असे त्यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलचे लोक त्यांना खूप आवडतात, मात्र तेथील सरकारने अनेक चुकीची कामे केली आहेत. यामुळेच त्यांनी ब्राझीलवर सर्वाधिक कर लागू केला आहे.
चीनकडून भारताला खास आमंत्रण; पंतप्रधान मोदी हेवे-दावे विसरुन करणार का दोस्ती?