अमेरिकेत एका १९ वर्षीय शीख तरुणावर वांशिक हल्ला (Attack On Sikh Man In US) झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये शटल बसमधून प्रवास करत असताना पगडी घातल्याच्या कारणावरून १९ वर्षीय शीख तरुणावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हा शीख तरुण गंभीर जखमी झाला आहे.
[read_also content=”भारतात समलैंगिक विवाहाला मान्यता नाहीच! सर्वोच्च न्यायालयानं मान्यता देण्यास दिला नकार https://www.navarashtra.com/india/homosexual-marriage-is-not-recognized-in-india-says-supreme-court-nrps-471051.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित तरुणाने पीडित तरुणाजवळ जाऊन त्याला पगडी उतरवण्यास सांगितले आणि ‘आम्ही या देशात पगडी घालत नाही, त्याने पगडी काढावी’, असे सांगितले. मात्र शीख तरुणाने पगडी उतरवण्यास नकार दिल्याने हल्लेखोराने शीख तरुणाच्या चेहऱ्यावर, पाठीवर व डोक्याच्या मागच्या बाजूला वारंवार ठोसे मारले, त्यामुळे किरकोळ जखमा झाल्या. बसमधून उतरण्यापूर्वी आणि घटनास्थळावरून पायी जाण्यापूर्वी त्याने पीडितेची डोक्यावरून पगडी काढण्याचा प्रयत्न केला, असे पोलिस अहवालात म्हटले आहे. पोलिस संशयित तरुणाचा शोध घेत आहेत.
एका अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क पोलीस या गुन्ह्याला ‘वांशिक हिंसाचार’ या श्रेणीत ठेवून या घटनेचा तपास करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी आपल्या जबानीत म्हटले आहे की, पीडित तरुणाने आपले नाव सार्वजनिक केले नाही. त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याने घटनास्थळी वैद्यकीय उपचार करण्यास नकार दिला.






