श्रीलंकेची भारतविरोधी खेळी! राष्ट्रपती दिसानायके थेट कच्चाथीवू बेटावर; तामिळ राजकारणात खळबळ, प्रकरण काय?(फोटो सौजन्य: एक्स/ @AzzamAmeen)
Shrilanka news in marathi : कोलंबो : एक मोठी बातमी समोर आली आले. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा दिसानायके यांनी तामिळनाडूच्या सीमेलगत असलेल्या बेटाला भेट दिली आहे. मात्र यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. १ सप्टेंबर रोजी दिसानायके यांनी अचानक कच्चाथीवू बेटाला भेट दिली. दिसानायके आणि श्रीलंकेच्या नौदल अधिकाऱ्यांच्या कच्चाथीवू बेटावरील उपस्थितमुळे भारतात खळबळ उडाली आहे.
शिवाय राष्ट्रपती दिसानायके यांनी ही भेट अशा वेळी दिली आहे जेव्हा, तामिळनाडूमधील राजकारणी अभिनेता विजय यांनी भारत सरकारकडे कच्चीतीवू बेट श्रीलंकेकडून परत घेण्याची मागणी केली आहे. यामुळे भारत आणि श्रीलंकेमध्ये वाद वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारत आणि श्रीलंकेमध्ये गेल्या अनेक काळापासून कच्चाथीवू बेटावरुन वाद सुरु आहे. याठीकाणी अनेकवेळा भारतीय मच्छीमार मासे पकडण्यासाठी जातात. यामुळे आतापर्यंत अनेकांना अटक करुन त्यांच्यावर कडक करावाई करण्यात आली आहे. यामुळे अनेक मच्छीमारांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कच्चाथीवू बेटावरुन हा वाद वाढत चालला आहे. हा वाद तामिळनाडूतील मच्छीमारांसाठी अत्यंत संवदेनशील बनला आहे.अशा परिस्थिती बेट परत घेण्याची मागणी आणि राष्ट्रपती दिसानायके यांच्या भेटीमुळे तणावात वाढ झाली आहे.
श्रीलंकेच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपती दिसानायके प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी जाफना प्रांतात गेले होते. परंतु त्यांनी अचानकपणे कच्चाथीवू बेटाला भेट दिली. त्यांच्यासोबत श्रीलंकने नौदलचे अधिकारीही उपस्थित होते. या टिकाणी त्यांनी २५८ एकर पर्यंत बेटाची पाहणी केली. राष्ट्रपती बेटावर बराच वेळ राहिले.
बेटावर त्यांनी वेळ घालवला तसेच तैनात असलेल्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. हे बेट श्रीलंकेचा अविभाज्य भाग आहे. यामुळे दिसानायके यांनी यावर कोणत्याही बाह्य देशाचा दबाव पडू देणार नाही आणि सार्वभैमत्व गमवणार नाही असे त्यांनी म्हटले. बेटाचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
Sri Lanka President Anura Kumara Dissanayake visited Kachchatheevu Island today after inaugurating projects in Jaffna, reaffirming the government’s commitment to safeguard Sri Lanka’s territory pic.twitter.com/lkz9ZYBAPW
— Azzam Ameen (@AzzamAmeen) September 1, 2025
याच वेळी तामिळनाडूच्या अभिनेता विजय यांनी भारत सरकारवर टीका केली आहे. मच्छिमारांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. श्रीलंका तामिळनाडूच्या मच्छीमारांना त्रास देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे हे बेट परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
कच्चाथीवू बेट हे ऐतिहासिकदृष्ट्या रामनाथपुरम राजांचा भाग होता. परंतु १९४७ मध्ये भारत आणि श्रीलंकेत करार करण्यात आला, ज्यानुसार बेट श्रीलंकेला सोपवण्यात आले. परंतु या करारानुसार, भारतीय मच्छीमारांना आणि यात्रेकरुंना या बेटावर प्रवास करण्याची परवानगी होती. अगदी मासेमारीचीही परवानगी होती.
मात्र १९७६ मध्ये दोन्ही देशात वाद सुरु झाला आणि सागरी सीमा उभारण्यात आल्या. यानंतर मासेमारीची परवानगीही रद्द करण्यात आली. यामुळे अनेक वेळा या बेटावर दोन्ही देशांच्या मच्छीमारांमध्ये संघर्षही झाला आहे. तसेच अनेक मच्छीमारांनाही अटक करण्यात आली आहे. यामुळे हा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.