Imran Khan : पाकिस्तानमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय? इम्रान खान यांना गुप्तपणे रुग्णालयात हलवलं, पाक पत्रकाराच्या दाव्याने खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इम्रान खान नव्हे, ईमान मजारी, जिने पाकिस्तानी लष्कराचं जगणं केलं मुश्किल ; काय आहे प्रकरण?
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांना तुरुंगातून गुप्तपणे रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. त्यांची गुप्त वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. २३-२४ जानेवारीच्या रात्री आदियाला तुरुंगातून इस्लामाबाद येथील तुरुंगात खान यांना हलवण्यात आले असल्याचे पाकिस्तानी पत्रकार जाहिद गिश्कोरी यांनी म्हटले आहे. पत्रकार जाहिद गिश्कोरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांना रुग्णायात नेण्यात आले त्यावेळी सेलमधील लाईट बंद करण्यात आले होते. त्यांना मागील गुप्त मार्गाने बाहेर काढण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. जवळपास अडीच तास खान रुग्णालयात होते. यानंततर त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले.
ही माहिती मिळताच इम्रान खान यांच्या पाकिस्तान-तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाने खान यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, याबाबत खान यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कळवण्यात आले नसल्याचे म्हटले. पीटीआयचे अध्यक्ष गौहर अली यांनी म्हटले की, खान यांची शेवटची भेट २० डिसेंबर २०२५ रोजी झाली होती. तेव्हापासून पक्षाचे सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला खान यांना भेटू देण्यात आलेले नाही.
सध्या यामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी देखील इम्रान खान यांची प्रकृती खराब झाल्याची अफवा पसरली होती. खान यांच्या बहिणींनी तुरुंग प्रशासनावर त्यांच्यावर मारहाण केल्याचा आणि गैरवर्तनाचा आरोप केला होता. तसेच इम्रान खान यांच्या पक्षानेही सरकारवर खान यांच्यासोबत तुरुंगात चुकीची वागणून दिली जात असल्याचा आरोप केला होता. त्यांना जेलमध्ये चांगली वागणूक दिली जात नसल्याचे म्हटले होते. या अफवेवर सरकराने स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, खान यांच्याबाबत पसरवण्यात आलेल्या निधनाच्या आणि प्रकृती खराब झाल्याच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे तुरुंग प्रशासनाने म्हटले होते. तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
Ans: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अचानक गुप्तपणे रुग्णालयात दाखल करण्यात आला असल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकार जाहिद गोश्किर यांनी केला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
Ans: इम्रान खान यांच्या पाकिस्तान-तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाने खान यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, याबाबत खान यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कळवण्यात आले नसल्याचे म्हटले.






