File Photo : High Speed TRAIN
बीजिंग : भारतातील सर्वांत हायस्पीड ट्रेन म्हणून ‘वंदे भारत’चा उल्लेख केला जातो. पण, या ट्रेनपेक्षा अधिक वेगवान असणार हायस्पीड ट्रेन चीनमध्ये धावली. या ट्रेनचा वेग ‘वंदे भारत’पेक्षा अडीच पटीने जास्त आहे. चीनने नेक्स्ट जनरेशन हाय स्पीड ट्रेन CR450 या ट्रेनच्या प्रोटोटाईपची चाचणी केली आहे आणि या ट्रेनचा चाचणी वेग 450 किमी प्रति तास असल्याचे समोर आले आहे.
हेदेखील वाचा : ‘शेख हसीनाला लवकर शिक्षा व्हावी’ , पहिले भारताला पत्र लिहिले अन्…; आता युनूस सरकारचा नवा डाव
चीनमध्येच जगातील हायस्पीड ट्रेन यापूर्वी धावली होती. आता या नव्या ट्रेनने चीनचाच जुना विक्रम मोडला आहे. ही नवीन ट्रेन चीनच्या CR400 Fuxing पेक्षा ताशी 100 किमी वेगाने धावेल. जगातील सर्वोत्तम प्रवासी सुविधा देण्याबरोबरच या नव्या ट्रेनमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. नेक्स्ट जनरेशन हाय-स्पीड ट्रेन CR450 बनवून जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनवण्याचा मानही चीनने पटकावला आहे. चीनने 2021 मध्ये हा प्रकल्प सुरू केला. सुरक्षितता, ऊर्जा कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष केंद्रित करणारी हाय-स्पीड ट्रेन तयार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. आता या ट्रेनच्या यशस्वीपणे धावण्याने त्यांचा उद्देश यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
चीन रेल्वे तंत्रज्ञानात जागतिक आघाडीवर जाण्याच्या मार्गावर आहे. कारण या ट्रेनचा वेग खूप वेगवान आहे आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी होईल. या ट्रेनच्या माध्यमातून सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी फक्त काही मिनिटे ते एक तास लागणार असल्याची माहिती आहे.
विमानाची बरोबरी करेल ही ट्रेन
साधारणपणे, जगातील प्रवासी विमानांचा सरासरी वेग ताशी 885 ते 933 किलोमीटर इतका असतो. त्याच वेळी, भारतात विमानाचा वेग ताशी 600 किलोमीटर आहे. जी चीनच्या नव्या ट्रेनपेक्षा फक्त 150 किलोमीटर जास्त आहे. याचा अर्थ चीनने बनवलेल्या या जगातील सर्वात वेगवान ट्रेनने प्रवास करणे आणि भारतीय विमानाने प्रवास करणे यात केवळ 15 मिनिटांचा फरक असेल.