सौजन्य : सोशल मीडिया
सेंटोसा : सध्या पर्यटनासाठी अनेकांची बाहेरील देशात जाण्याला पसंती असते. पण अशाच पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण, सिंगापूरच्या सेंटोसा बेटावरील तीन प्रसिद्ध असे बिचेस बंद करण्यात आली आहेत. या समुद्रकिनारांच्या जवळच्या बंदरात मोठी तेल गळती झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सांटोसा बेटाचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करणारे असे आहे. त्यामुळे या बेटाला पर्यटकांची चांगली पसंती असते. यापूवी या बेटावर जाणाऱ्यांची संख्या कमी होती. मात्र, आता या बेटावर पर्यटकांची चांगली गर्दी असते. सेंटोसा बेट हे एक पर्यटन स्थळ आहे, जिथे गोल्फ कोर्ट आणि युनिव्हर्सल स्टुडिओ पार्क आहे. त्यामुळे पर्यटकही येथे येतात.
त्यातच नेदरलँडचा ड्रेजर आणि सिंगापूरच्या बंकर जहाज यांच्यात 15 जूनला धडक झाली होती. या धडकेमुळे बंदरातच मोठी तेल गळती झाली. याच पार्श्वभूमीवर सिंगापूरमधील सेंटोसा बेटावरील तीन लोकप्रिय समुद्रकिनारे बंद करण्यात आले आहेत. यामुळे पर्यटकांची मोठी नाराजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.