नवी दिल्ली – अमेरिकेतील एका २८ वर्षीय अधिकाऱ्याने दोन जणांची हत्या करून स्वतःवरून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑस्टिनली एडवर्ड्स असे त्या २८ वर्षीय कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
दरम्यान, तो एका मुलीशी १७ वर्षांच्या मुलगा असल्याचे सांगून सोशल मीडियाद्वारे तिच्या संपर्कात होता. त्याने त्या तरूणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे कुटुंब, पत्ता यासह सर्व वैयक्तिक माहिती मिळवली होती. काही दिवसांने ऑस्टिनली याने त्या मुलीला नग्न अवस्थेतील फोटो पाठवण्यास सांगितले. तेव्हा त्यामुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले.
अखेर संतप्त झालेल्या एडवर्ड्सने व्हर्जिनियाहून कॅलिफोर्निया गाठले. त्या ठिकाणी राहणाऱ्या मुलीच्या घरी गेला. तिथे त्याने मुलीशी वाद घातला. रागाच्या भरात त्याने प्रथम मुलीची आई आणि आजोबांची हत्या केली. त्यानंतर मुलीच्या घरालाही आग लावून दिली. या घटनेनंतर, सॅन बर्नार्डिनो पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, एडवर्ड्स घटनास्थळावरून पळाला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून गोळीबार सुरू केला. तेव्हा एडवर्ड्सने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. या घटनेत पीडित मुलगी वाचली.
एडवर्ड्स हा व्हर्जिनियातील डेप्युटी शेरीफ पदावर कार्यरत होता. शेरीफ जिल्ह्याचा तो उच्च अधिकारी होता. ज्यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असते. शेरीफच्या प्रवक्त्या ग्लोरिया हुएर्टा यांनी सांगितले की, अपघाताची चौकशी सुरू आहे. एडवर्ड्सने आत्महत्येत सरकारी सेमी-ऑटोमॅटिक सर्व्हिस पिस्तूल वापरल्याचे तपासकांनी सांगितले. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांच्या हत्येचा तपास करणार्या रिव्हरसाईड पोलिस विभागाने याबाबत मौन बाळगले आहे. मुलीच्या कुटुंबीयांची हत्या कशी झाली याबाबत पोलिसांनी माहिती दिलेली नाही.






