US News: डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली.
अमेरिकेने कॅरिबियनमध्ये युद्धनौका व ४,००० सैनिक तैनात केले.
निकोलस मादुरो यांनी अमेरिकेवर नैसर्गिक संसाधनांवर कब्जा करण्याचा आरोप करत ट्रम्पची योजना फेटाळली.
Trump Venezuela threat : अमेरिकन राजकारण नेहमीच जगाच्या लक्षात असते. कधी रशिया-युक्रेन युद्ध, कधी इस्रायल-हमास संघर्ष अमेरिकेची भूमिका चर्चेत राहिलीच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व सध्या पुन्हा सत्तेच्या शर्यतीत उतरलेले डोनाल्ड ट्रम्प हे नेहमी त्यांच्या भाषणांमध्ये दावा करतात की, “मी निवडून आल्यावर एका दिवसात जगातील युद्ध थांबवीन.” परंतु वास्तवात परिस्थिती उलटच दिसत आहे. ट्रम्प यांच्याच नेतृत्वाखाली अमेरिका आता एका नव्या संघर्षाच्या उंबरठ्यावर उभी आहे तो म्हणजे व्हेनेझुएलाशी संभाव्य युद्ध.
ट्रम्प यांनी अलीकडेच माध्यमांसमोर असा दावा केला की, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या राजवटीतून धोकादायक टोळी सदस्य, ड्रग्ज विक्रेते आणि अमली पदार्थ अमेरिकेत पाठवले जात आहेत. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी ही बाब धोकादायक असल्याने ती कुठल्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vision2030 : दीर्घायुष्याचा सौदी फॉर्म्युला! जाणून घ्या ‘या’ देशाने कसे पोहोचवले नागरिकांचे आयुर्मान 46 वरून 79 वर
या वक्तव्यांनंतर लगेचच मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने दक्षिण कॅरिबियन प्रदेशात तीन युद्धनौका व जवळपास ४,००० सैनिक तैनात केले आहेत. ही लष्करी हालचाल पाहता, अमेरिका व्हेनेझुएलावर थेट कारवाई करण्याची शक्यता अधिक बळकट होत आहे. नुकतेच अमेरिकेने कॅरिबियनमध्ये एक बोट लक्ष्य केली होती ज्यामध्ये ११ व्हेनेझुएलाचे नागरिक ठार झाले. वॉशिंग्टनच्या मते हे सर्व लोक कुख्यात ड्रग्ज तस्कर होते. मात्र या घटनेने दोन्ही देशांमधील शत्रुत्व आणखी तीव्र झाले आहे.
जेव्हा ट्रम्प यांना थेट विचारले गेले की, अमेरिका खरंच व्हेनेझुएलावर हल्ला करणार का? तेव्हा त्यांनी “काय होते ते पाहूया” असे उत्तर देत हल्ल्याची शक्यता पूर्णपणे नाकारली नाही. यामुळे अमेरिकन धोरणाबाबत जगभरात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
🚨 BREAKING: President Trump is considering launching US military strikes on terrorist cartels INSIDE Maduro’s Venezuela, on top of taking them out in the Caribbean, per CNN.
The Department of War is going to war with the cartel terrorists. Here we go. pic.twitter.com/28r7PdYcGb
— Eric Daugherty (@EricLDaugh) September 5, 2025
credit : social media
दुसरीकडे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी ट्रम्प यांचे आरोप फेटाळून लावत अमेरिकेवरच गंभीर पलटवार केला आहे. मादुरो यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या सरकारने देशातील सर्व टोळ्यांचा खात्मा केला असून अमेरिकेचा आरोप निराधार आहे. उलट अमेरिकाच व्हेनेझुएलातील नैसर्गिक संसाधनांवर ताबा मिळवण्यासाठी ड्रग्ज तस्करीच्या बहाण्याचा वापर करत आहे, असा त्यांचा दावा आहे.
मादुरो यांच्या मते, ट्रम्प यांची ही कारवाई एका मोठ्या जागतिक धोरणाचा भाग आहे. अमेरिका आपल्या लष्करी शक्तीच्या जोरावर जगभरातील सरकारांना दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. “हे फक्त व्हेनेझुएलाचा मुद्दा नाही, तर संपूर्ण जगावर अमेरिकेचे नियंत्रण प्रस्थापित करण्याची योजना आहे,” असे ते म्हणाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gen-Z protest : नेपाळचे संपूर्ण राजकारण अवघ्या 3 दिवसांत बदलले; सुशीला कार्की यांच्या विरोधात Gen-Z मैदानात उतरले
महत्वाचे म्हणजे, ट्रम्प नेहमी युद्ध संपवण्याची भाषा करतात; मात्र आज तेच युद्धाला चालना देत आहेत. यामुळे अमेरिकन जनतेत व आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्रम्प यांच्या विश्वसनीयतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. ‘शांततेचा दूत’ बनण्याचा दावा करणारे ट्रम्प आज स्वतःच युद्धाचे शंखनाद करत आहेत, ही मोठी विरोधाभासी परिस्थिती मानली जाते. आज जगभरातली परिस्थिती आधीच अस्थिर आहे युक्रेन, गाझा पट्टी, आशियातील संघर्षाचे धुमारे. अशा वेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाविरोधात लष्करी कारवाईची शक्यता व्यक्त करणे, हे केवळ दोन देशांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवणारे ठरू शकते. हा संघर्ष थांबेल की आणखी एका नव्या युद्धाची सुरुवात होईल, याकडे आता जगाचे डोळे लागले आहेत.