पाप - पुण्याचा हा कसला हिशोब? 165 लीटर तूप थेट गंगेत ओतलं ...; नेटकऱ्यांचा संताप, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही लोक नदीकाठी उभे आहे. त्याच्याजवळ 10 हून अधिक तूपाचे डब्बे आहेत. पुण्य मिळवण्यासाठी या लोकांनी सर्व तूपाचे डब्ब गंगा नदीत ओतले आहे. या व्हिडिओमुळे प्रदूषणाचा आणि अन्नाच्या नासाडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गंगा नदी साफ करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च लागते. अशा वेळी श्रद्धेच्या नावाखाली असला बाजारामुळे पैशांचेही नुकसान होते. गंगा नदीत अंघोळ केल्याने पुण्य मिळते, तेल-तूप ओतले की पुण्य मिळते असे कोणत्या एखाद्या भटजींनी जोतिष्याने सांगितले की, त्यावर कोणत्याही प्रकारचा तर्क-वितर्क न करता विज्ञानाशी विसंगत नसलेली कृतीय करायची.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
विज्ञानाच्या युगातही माणूस किती मागदे आहे या व्हिडिओवरुन स्पष्ट होते. नदीत तूप अर्पण केल्याने पितृदोष दूर होतो, मोक्ष मिळते यटा भ्रमात हजारो लोक बळी पडतात. तसेच जादूटोणा, भूत-प्रेत यांसारख्या अनेक गोष्टींमध्येही लोक अलीकडे डोळे बंद ठेवून विश्वास ठेवत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @baimanus.in या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, काही लोकांना अक्कल आणि मरण येत नाही, तर दुसऱ्या एकाने याच्या पेक्षा मोठे पाप नाही असे म्हटले आहे. तसेच अनेकांनी या लोकांवर कारवाईची मागणी केली आहे.
आता अजगर करून घेतोय लोकांकडून Yoga! फिटनेस जगात खळबळ, जिवंत सापांसह फिटनेस; Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






