Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UK Ram Mandir Row: ‘आमच्याकडे पैशांची…’ राम मंदिराची जागा मशिदीसाठी विकणाऱ्या युके कौन्सिलचा कोर्टात धक्कादायक युक्तिवाद

UK Ram Mandir News: पीटरबरो येथील ४० वर्षे जुन्या राम मंदिराची जमीन यूके इस्लामिक मिशनला सुपूर्द करण्यात आली आहे. मंदिर वाचवण्यासाठी १.४ दशलक्ष पाऊंडची बोली लावणाऱ्या एका हिंदू ट्रस्टला निधी कमी पडला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 15, 2026 | 03:00 PM
uk peterborough ram mandir sold to islamic mission mosque high court battle bharat hindu samaj

uk peterborough ram mandir sold to islamic mission mosque high court battle bharat hindu samaj

Follow Us
Follow Us:
  • ४० वर्षांचे मंदिर धोक्यात
  • हिंदू ट्रस्टची बोली नाकारली
  • हायकोर्टात कायदेशीर लढाई

ब्रिटनमधून (UK) एक अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त बातमी समोर येत आहे. पीटरबरो (Peterborough) शहरातील न्यू इंग्लंड कॉम्प्लेक्समध्ये असलेले, तब्बल ४० वर्षे जुने ऐतिहासिक ‘भारत हिंदू समाज’ (Bharat Hindu Samaj) राम मंदिर आता एका मोठ्या कायदेशीर आणि धार्मिक संकटात सापडले आहे. पीटरबरो सिटी कौन्सिलने एका स्पर्धात्मक बोली प्रक्रियेनंतर या मंदिराची जमीन थेट ‘यूके इस्लामिक मिशन’ (UKIM) या मुस्लिम संघटनेला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण यूकेमधील ब्रिटिश हिंदू समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे, कारण या जागेवर आता मशीद (Masjid Khadijah) आणि मदरसा बांधण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

या ४० वर्षे जुन्या मंदिराची स्थापना १९८६ मध्ये युगांडामधून आलेल्या हिंदू निर्वासित कुटुंबांनी केली होती. हे मंदिर केवळ पीटरबरो शहरासाठीच नाही, तर आसपासच्या ५६ ते ६० किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या हजारो हिंदू कुटुंबांचे एकमेव श्रद्धास्थान आणि सामाजिक केंद्र आहे. जर हे मंदिर इथून हटवले गेले, तर स्थानिक हिंदूंना पूजा-अर्चा आणि सणांसाठी थेट केंब्रिज किंवा लेस्टर शहरात जावे लागेल, जे इथून खूप दूर आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने या पवित्र जागेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे.

मंदिर वाचवण्यासाठी लावलेली १.४ दशलक्ष पाऊंड्सची बोली ठरली अयशस्वी

मिळालेल्या माहितीनुसार, ‘भारत हिंदू समाज’ ट्रस्टने हे मंदिर वाचवण्यासाठी आणि ती जागा विकत घेण्यासाठी १.४ दशलक्ष पाऊंड्सची (सुमारे १८ कोटी रुपये) मोठी बोली लावली होती. यामध्ये ९,००,००० पाऊंड्स रोख आणि उर्वरित रक्कम त्यांच्या सामाजिक सेवेच्या मूल्याच्या स्वरूपात होती. मात्र, पीटरबरो सिटी कौन्सिलने या बोलीला डावलून ‘यूके इस्लामिक मिशन’च्या बोलीला मंजुरी दिली. इस्लामिक मिशनने कौन्सिलसमोर ५.४ दशलक्ष पाऊंड्सचा रोख निधी सादर केला होता, ज्यामुळे कौन्सिलने आर्थिक फायद्याचा विचार करत मंदिराची जमीन मुस्लिम संघटनेला विकण्याचा निर्णय घेतला. कौन्सिलच्या वकिलांनी थेट न्यायालयात सांगितले की, “कौन्सिलकडे सध्या पैशांची चणचण आहे, त्यामुळे आम्ही पैशांना प्राधान्य दिले”.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Strikes Iran: इराणवर अमेरिकेचा 7 तास थरारक बॉम्बहल्ला! होर्मुझ सामुद्रधुनीजवळ युद्ध पेटले; युद्धनौका आणि लढाऊ विमाने मैदानात

कौन्सिलच्या या उत्तरामुळे न्यायालयाच्या गॅलरीत उपस्थित असलेल्या हिंदू नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि आश्चर्य व्यक्त करण्यात आले. हिंदूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी युक्तिवाद केला की, स्थानिक कौन्सिलने ‘इक्वालिटी ॲक्ट २०१०’ (Equality Act 2010) चे उल्लंघन केले आहे, कारण एका मोठ्या हिंदू लोकसंख्येचे एकमेव प्रार्थनास्थळ हिरावून घेताना कौन्सिलने त्यांच्या धार्मिक हक्कांचा कोणताही विचार केला नाही.

धार्मिक समीकरणे आणि मशिदींची वाढती संख्या

या संपूर्ण वादात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे या परिसरातील धार्मिक समीकरणे. पीटरबरो आणि आसपासच्या भागात आधीच जवळपास १९ ते ३० मशिदी सुस्थापित आहेत. असे असताना, ५० ते ६० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या हजारो हिंदूंसाठी असलेल्या एकमेव मंदिराची जागा पाडून तिथे आणखी एक मशीद उभारण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, असा सवाल हिंदू ट्रस्टच्या विश्वस्त गौरी चौधरी यांनी उपस्थित केला आहे. कौन्सिलमध्ये नुकत्याच झालेल्या राजकीय बदलाबद्दल आणि प्रशासकीय भूमिकेबद्दलही आता विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या कायदेशीर लढाईत हिंदू समाजाला केवळ भारतातूनच नाही, तर स्थानिक चर्च आणि ज्यू समुदायांकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेक सामाजिक संस्थांनी या मंदिराच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मदत केली आहे. मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, त्यांचा विरोध कोणत्याही मुस्लिम संघटनेला किंवा मशिदीला नाही, तर पीटरबरो सिटी कौन्सिलच्या चुकीच्या आणि अन्यायकारक निर्णय प्रक्रियेला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Hardball: पंजाब, अमेरिका व्हाया कॅनडा; ‘या’ भारतीय गुंडाने अमेरिकेत पसरवले गुन्हेगारीचे साम्राज्य; FBI च्या हिटलिस्टवर

बाबरी प्रकरणाशी जोडले जाणारे धागेदोरे

या संपूर्ण प्रकरणाची तुलना आता अयोध्या येथील ऐतिहासिक बाबरी मशिदीच्या घटनेशी केली जात आहे. ब्रिटनमधील काही समाजकंटकांकडून या जागेवर मशीद बांधण्याच्या हट्टामागे एक विशिष्ट ‘प्रतीकात्मक संदेश’ देण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. जर ऐतिहासिक हिंदू मंदिर पाडून तिथे मशीद बांधली गेली, तर हा संपूर्ण ब्रिटनच्या सामाजिक सलोख्यासाठी आणि धार्मिक शांततेसाठी एक अत्यंत दुर्दैवी आणि काळा दिवस ठरेल, असा इशारा हिंदू नेत्यांनी दिला आहे.

Web Title: Uk peterborough ram mandir sold to islamic mission mosque high court battle bharat hindu samaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • britain
  • ram mandir
  • World news

संबंधित बातम्या

Mohan Bhagwat : न्यूयॉर्कमध्ये गुंजला सनातन धर्माचा आवाज; ‘पळून जाऊ नका, कर्तव्य करा!; RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान
1

Mohan Bhagwat : न्यूयॉर्कमध्ये गुंजला सनातन धर्माचा आवाज; ‘पळून जाऊ नका, कर्तव्य करा!; RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

PM Modi: पंतप्रधान मोदींचा उझबेकिस्तान आणि किर्गिझस्तानचा महत्त्वाचा दौरा; ‘कनेक्ट सेंट्रल एशिया’ धोरणाला मिळणार नवी गती
2

PM Modi: पंतप्रधान मोदींचा उझबेकिस्तान आणि किर्गिझस्तानचा महत्त्वाचा दौरा; ‘कनेक्ट सेंट्रल एशिया’ धोरणाला मिळणार नवी गती

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था
3

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप
4

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.