पाकिस्तानच्या सर्वोच्च धर्मगुरुंचा सरकारलाच घरचा आहेर; म्हणाले 'भारत आपल्यापेक्षा खूप...' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे देशात संतापाचे वातावरण पसरले होते. पाकिस्तानविरोधात कारवाईची मागणी केली जात होती. दरम्यान भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई केली आहे. यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचे उच्चस्तरिय नेते आणि लष्करी अधिकारी भारताला वारंवार धमक्या देत आहे.
परंतु आता त्यांच्या देशातील लोकांनी त्यांची साथ सोडल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला. आता यानंतर पाकिस्तानचे सर्वाच्च धर्मगुरुंनी देखील यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. तसेच जनतेला देखील दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना मोठा धक्का बसला आहे. इस्लामाबाद येथील लाल मशिदीचे मौलवी अजीज गाझी यांनी लोकांना युद्धापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे धार्मिक युद्ध नाही, त्यापासून दूर राहावे. मौलाना अजीज यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांमध्ये गणले जाते. इस्लामाबादच्या लाल मिशिदीचे ते मौलवी आहेत. ही सर्वात प्रसिद्ध मशीद आहे. दरम्यान मौलाना अब्दुल अजीज गाझी यांनी लोकांना विचारले की, तुम्ही भारतासोबत युद्ध लढणार आहात का? युद्ध लढणार नसाल तर तुम्ही शहाणे आहात.
तसेच मौलाना अजीज यांनी असेही म्हटले की, ही भारत आणि पाकिस्तानमधील लढाई धार्मिक नाही. हे केवळ दोन देशांमधील युद्ध आहे. हे युद्ध केवळ सरकारनेच लढले पाहिजे. यामध्ये जनतेने सहभागी होऊ नये. धर्मासाठी आवश्यक असल्यास तुम्ही युद्धात सामील होऊ शकता. पण या युद्धाचा कोणालाही फायदा होणार नाही. यासाठी लढण्याची गरज नसून शहाणपणाने वागा असे मौलाना अजीज यांनी म्हटले.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक नेत्यांकडून धक्कादायक अशी विधाने समोर आली आहेत. तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पाकिस्तानला अल्लाहचा देश म्हणून संबोधले होते. त्यांनी म्हटले होते की, अल्ल्हाच्या इच्छेने जगात केवळ दोनच देश स्थापन झाले आहे, एक सौदी अरेबिया आणि दुसरा पाकिस्तान. मुनीर यांनी हिंदूविरोधतही वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
तसेच भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री, रेल्वे मंत्री यांनीही भारताला धमक्या दिल्या आहेत. पाकिस्तानकडून वांरवार अणुहल्ल्याची धमकी दते आहे.






