Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : मोजतबा खामेनेई कुठे आहेत? अमेरिका इराणमधील वाढत्या तणावादरम्यान खामेनेईंसंबंधी मोठी अपडेट समोर 

Mojtaba Khamenei Health Update : अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूची शंका अधिक जास्त व्यक्त केली जात आहे. पण...

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 12, 2026 | 11:44 AM
Mojtaba Khamenei

Mojtaba Khamenei

Follow Us
Follow Us:
  • इराणचे सर्वोच्च नेते अपंग?
  • अमेरिका इराण वाद विकोपाला
  • जगभरात चिंतेचे वातावरण
Mojtaba Khamenei Health Update : तेहरान : अमेरिका इराणमध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहे.  पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्लामाबाद येथे सुरु असलेली चर्चा फिस्कटली असून दोन्ही देशांत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. यामुळे मध्यपूर्वेत अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांच्या गायब होण्याबाबत जगभरात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

US Iran Peace Talks : इराणचा झुकण्यास नकार…; अयशस्वी शांतता चर्चेसाठी अमेरिकलाच धरले जबाबदार, मध्यपूर्वेत पुन्हा हाहा:कार माजणार

मिळालेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल अमेरिकेच्या संयुक्त लष्करी कारवाईत मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत खामेनेई सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत यामुळे त्यांचा मृत्यूची किंवा कोमात असल्याच्या अफवांना बळ मिळाले होते. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, खामेनेईच्या काही निकटवर्तींयांनी मोजतबा खामेनेई जिवंत असल्याचे म्हटले आहे.

कुठे आहेत मोजतबा खामेनेई?

सुत्रांनी सांगितले की, सध्या खामेनेई यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे. त्यांच्या चेहऱ्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. परंतु ते मानसिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत आहेत. एका सुत्राने असाही दावा केला होता की, खामेनेई यांनी अमेरिका (America) इराणच्या इस्लामाबाद चर्चेत ऑडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग घेतला होता. त्यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपले मत मांडले होती. तर तिसऱ्या एका सुत्राने दावा केला आहे की हल्ल्यात मोजतबा खामेनेईंनी त्यांचा एक पाय गमावला आहे. परंतु याला अधिकृतपणे इराणी अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळालेला नाही.

खामेनेईंच्या मृत्यूचे गूढ कायम

अमेरिका-इस्रायच्या हल्ल्यात इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची सर्वोच्च पदी निवड झाली. परंतु तेव्हापासून ना त्यांचा फोटो, व्हिडिओ आणि नाही ते स्वत: जगासमोर आल्याने त्यांच्या मृत्यूची शंका अधिक गढद होत आहे. इराणी माध्यमांनी केवळ त्यांचा संदेश वाचून दाखवला आहे.

अमेरिका इराण चर्चा फिस्कटली, युद्ध पेटणार

दुसरीकडे अमेरिका-इराण शांतता चर्चा (US Iran Peace Talks) अपयशी ठरली आहे. इराणने अमेरिकेच्या अटी नाकारत झुकण्यास नकार दिला आहे. यामुळे अमेरिकेकडून लष्करी कारवाईचे संकेत मिळाले आहेत. या वाढत्या तणावपूर्ण परिस्थिती मध्यपूर्वेतील आखाती देशांवर हल्ल्याची भीती वाढली आहे. तसेच जगावर पुन्हा महागाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

US Iran शांतता चर्चा फिस्कटली; त्यापूर्वीच भारताचे LPG टँकर Hormuz मधून सुखरुप बाहेर, जग पाहतचं राहिलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुठे आहेत मोजतबा खामेनेई?

    Ans: रिपोर्टनुसार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या लष्करी हल्ल्यात मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर गुप्त ठिकाणी उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. तर एका सुत्राने त्यांनी हल्ल्यात पाय गमवला असल्याचा दावा केला आहे.

  • Que: मोजतबा खामेनेईंच्या प्रकृतीबाबत अमेरिकेने काय दावा केला आहे?

    Ans: अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, मोजतबा खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची किंवा ते कोमात असल्याची शक्यता आहे. परंतु या दाव्याला इराणने फेटाळले असून मोजतबा खामेनेई जिंवत असून त्यांच्यावर सुरक्षित ठिकाणी उपचार सुरु असल्याचे म्हटले आहे.

  • Que: खामेनेई इराणचा कारभार कसा संभाळत आहेत?

    Ans: आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या रिपोर्टनुसार, मोजतबा खामेनेई ऑडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वरिष्ठ लष्करी अधिकारी, सरकारी अधिकाऱ्यांशी बैठक घेत आहेत. अमेरिका इराण शांतता चर्चेतही त्यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Us iran peace talks where is mojtaba khameni health update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Mojtaba Khamenei
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
1

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
2

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
3

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
4

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.