अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; कारण काय तर... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील व्यापार संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता मात्र हे संबंध पुन्हा एकदा सुरळीत होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण भारतासोबत ट्रेड डील करणार आहोत, असे म्हटले आहे. अशातच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांत लवकरच मोठा व्यापार करार होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यासाठी व्यापार निर्बंधांची धमकी दिल्याचे सांगितले. त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले आणि त्यांना आतापर्यंत पाहिलेले सर्वांत आकर्षक व्यक्ती म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे वेळप्रसंगी खूप कठोर राहतात. मी भारतासोबत व्यापार करारावर काम करत आहे आणि मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. आमचे खूप चांगले संबंध आहेत. त्याचप्रमाणे, त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचेही कौतुक केले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सात विमाने पाडल्याचा दावा केला. मात्र, ही विमाने कोणत्या देशाची होती हे स्पष्ट केले नाही. हे दोन अण्वस्त्रधारी देश आहेत आणि ते प्रत्यक्षात एकमेकांशी लढत होते. मग मी पंतप्रधान मोदींना फोन केला. तुमच्यासोबत व्यापार करार करू शकत नाही, असे त्यांनी सांगितल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार कौतुक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार पंतप्रधानांचे कौतुक करत आहेत. बुधवारी त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि त्यांना ‘सर्वात सुंदर दिसणारा माणूस’ असे संबोधले. त्यांची प्रशंसा केल्यानंतर, ट्रम्प यांनी त्यांचा खोटा दावाही पुन्हा सांगितला. त्यांनी पुन्हा सांगितले की, यावर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, हा दावा भारताने वारंवार फेटाळून लावला आहे. यावेळी ट्रम्प यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराच्या लवकरच होणाऱ्या स्वाक्षरीबाबतचही भाष्य केले.
हेदेखील वाचा : AFG vs PAK War: पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला! संरक्षणमंत्र्यांची उघड धमकी: ‘दहशतवादी हल्ला झाल्यास अफगाण तालिबानला…!’






