इराणमध्ये मोठी क्रांती! जोरदार निदर्शनानंतर महिलांना मिळाले बाईक चालवण्याचे स्वातंत्र्य (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे उपराष्ट्रपती रेजा आरिफ यांनी मंगळवारी(०३ फेब्रुवारी) महिलांच्या हक्कासंदर्भातील ठरावावर स्वाक्षरी केली होती. इराण मंत्रिमंडळाकडून देखील या ठरवाला मान्यता दिली होती. या ठरावा अंतर्गतच इराणी पोलिस महिलांना मोटारसायकल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच पोलिसांच्या देखरेखीखाली परीक्षा घेतली जाईल आणि पास झालेल्यांना अधिकृत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाईले.
यापूर्वी इराणमध्ये महिलांना मोटारसायक, स्कूटर चालवण्यास मनाई नव्हती. परंतु सरकारने त्यांना अधिकृत परवाना देण्यास नकार दिला होता. यामुळे महिलांना अनेक अडचणींचा समाना करावा लागत होता. एखादा रस्ता अपघात झाल्या, त्यामध्ये महिला जखमी झाली तर परवाना नसल्यामुळे त्यांनाच दोषी मानले जायचे. परंतु या नव्या निर्णयामुळे आता ही समस्या सुटणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, इराण सरकारने हा नुकत्याच झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला ही निदर्शने महागाई आणि आर्थिक घसरणीमुळे सुरु होती. परंतु नंतर ही निदर्शने सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात रुपांतरित झाले. या निदर्शनांना दाबण्यासाठी लोकांवर कडक कारवाई करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, सरकारच्या कारवाईत ३००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या निदर्शनांवर बळाचा वापर केल्याने प्रचंड हिंसाराचे वातावरण झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. दरम्यान आता नव्या निर्णायाने इराणमध्ये मुलांच्या हक्कांसाठी एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे. यामुळे महिलांना काहीसे स्वातंत्र मिळाले असून त्यांच्यासोबत होणार भेदभाव कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या या निर्णयाने इराणी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.






