Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Tariff Threat : ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ डाव; रशियन तेल खरेदीवरुन भारत पुन्हा निशाण्यावर

US Tariff Threat : युक्रेनमधील वाढते हल्ले पाहता रशियावर निर्बंद लादण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर रशियावर निर्बंध लादण्यासाठी एक नवा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. रशियावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न अमेरिका करत असून पुन्हा त्याच्याकडून तेल खरेदी करणाऱ्या देशावर टॅरिफचा बडगा उगारण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 15, 2026 | 04:04 PM
US Tariff Threat

US Tariff Threat

Follow Us
Follow Us:
  • भारतावर पुन्हा टॅरिफ लादणार अमेरिका?
  • रशियन तेल खरेदीवरुन कारवाईची शक्यता
  • हे पाच देशही निशाण्यावर
US Tariff Threat Russian Oil News in Marathi : वॉशिंग्टन : भारत पुन्हा एकदा अमेरिकेच्या निशाण्यावर आला आहे. रशियाकडून तेल खरेदीवरुन अमेरिका कारवाई करण्याच्या तयारीत असून भारतावर आणि आणखी काही देशांवर १००% टॅरिफ लादण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेन सिनेटमध्ये रशियावरील निर्बंधांशी संबंधित एक नवे विधेयक मांडण्यात आले आहे. यामध्ये भारतासह चीन, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि अझरबैजान या देशांचा समावेश आहे.

US China Relations : अमेरिकन शास्त्रज्ञ चीनच्या ताब्यात! ६०० दिवसांपासून हेरगिरीच्या आरोपाखाली कोठडीत, काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, रशियावरील निर्बंधाच्या प्रस्तावाला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक अशा दोन्ही पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. रशियाच्या उर्जा निर्यातीवर आर्थिक दबाव निर्माण करण्याचा जेणेकरुन त्याची युद्धक्षमता कमी होईल असा यामागाचा उद्देश आहे. यापूर्वी ५००% टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु नव्या सुधारित प्रस्तावानुसार, १००% टॅरिफ लादले जाण्याची शक्यता आहे.

काय आहे कारण?

हे विधेयक मंजूर झाल्यावर अमेरिका केवळ रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या कारणावरुन एखाद्या देशावर मोठा टॅरिफ लादू शकते. तसेच रशियाच्या केंद्रीय बँकावर, उर्जा प्रकल्पांवर, शॅडो टँकर ताफ्यावर आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही अमेरिका निर्बंध लादण्याची शक्यता आहे.

भारताला सर्वाधिक धोका

रशिया हा भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार आहे. भारताने जून २०२६ मध्ये रशियाकडून प्रतिदिन २६.१ लाख बॅरल कच्चे तेले आयात केले होते. हा भारताच्या एकूण तेल निर्यातींपैकी ५२.४% हिस्सा आहे. मे महिन्याच्या तुलनेत भारताने जवळपास ३९% अधिक तेल आयात रशियाकडून केली आहे.

युरोपीय देशांना सवलत

मात्र, दुसरीकडे काही युरोपीय देशांना सवलत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. रशियाकडून नैसर्गिक वायूची मर्यादित आयात करणाऱ्या आणि त्यावर अवलंबित्व कमी ठेवणाऱ्या देशांवर १००% टॅरिफमधून सुट मिळण्याची शक्यता आहे. परंतु या भेदभावामुळे मोठा वादही निर्माण होण्याची शक्यता आहे.

सध्या हे विधेयक कायद्यात रुपांतरित झालेले नाही. यासाठी सिनेच आणि प्रितिनधीगृहा अशा दोन्ही सभागृहांची मंजूरी आवश्यक आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी होऊन हे विधेयक लागू होते. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प राष्ट्रीय हित लक्षात घेता काही देशांना टॅरिफ निर्बाधांपासून सूट देण्याची शक्यता आहे. यामुळे या विधेयकाकडे भारतासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Sheikh Hasina मायदेशी परतणार, पण पुढे काय? बांगलादेशकडून मृत्यूदंडाबाबत मोठे संकेत

Web Title: Us tariff threat trump targets india china over russian oil imports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • China
  • Russia
  • Tariff
  • Trump tariffs
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.