Sheikh Hasina मायदेशी परतणार, पण पुढे काय? बांगलादेशकडून मृत्यूदंडाबाबत मोठे संकेत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बांगलादेशचे पंतपप्रधान तारिक रहमान यांचे सल्लागार जाहेद उर रहमान यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबत मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलनात मानवतेविरोधील गुन्ह्यांचे आरोप हसीना यांच्यावर आहेत. यामुळे त्यांना परतल्यावर न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावेच लागेल. त्यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी जगातील सर्वोत्तम वकिलांची मदत घेण्यासही हरकत नाही, असे रहमान यांनी म्हटले.
रहमान यांनी पुढे म्हटले, हसीना मायदेशी परतण्याचा योग्य निर्णय घेतला असून आम्ही याचे स्वागत करते. देशातील नागरिक त्यांच्यावर आरोपांप्रकरणी कठोर शिक्षेची मागणी करत आहे. परंतु अंतिम निर्णय हा न्यायालयाचाच राहिल.
त्यांनी स्पष्ट केले की, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाची सुनावणी पारदर्शक असेल. यावर निरीक्षकांचे लक्ष असेल आणि न्यायालयीन कमाकाजाचे व्हिडिओही प्रसारणही केले जाऊ शकते. कायदेशीर प्रक्रियेनुसारच पुढील निर्णय घेतले जातील असे त्यांनी सांगितले.
याच वेळी हसीना यांनी बांगलदेशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र टीका केली आहे. अंतरिम सरकार आणि BNPच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाही, कायद्याचे राज्य आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप हसीना यांनी केला असून अर्थव्यवस्था कमकुवत झाली असल्याचे म्हटले. तसेच यापूर्वीच्या अंतरिम सरकारमुळे देशात कट्टरतावाद वाढला आणि अजूनही वाढत असल्याचा दावा त्यांनी केला
हसीना यांनी आपला पक्ष अवामी लीगवरील निर्बंधानाही विरोध केला आहे. त्यांनी अवामी लीग हा केवळ एक राजकीय पक्ष नसून नागरिकांच्या मनातील एक चळवळ असल्याचे म्हटले. सरकार आमची कार्यलये बंद करु शकते, राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालू शकते. पण लोकांच्या मनातून अवामी लीगला हटवू शकत नाही असे त्यांनी म्हटले.
तसचे त्यांनी बांगलादेशात हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समुदाय असुरक्षित असल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी मंदिरांवरील हल्ले, मूर्तीची तोडफोड आणि धार्मिक कार्यक्रमांमधील अडथळे निर्माण होत असल्याचे म्हटले.






