US China Relations : अमेरिकन शास्त्रज्ञ चीनच्या ताब्यात! दीड वर्षांपासून हेरगिरीच्या आरोपांखाली कोठडीत, काय आहे प्रकरण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
यूलिन चेन यांचा जन्म चीनमध्ये झाला असून २०११ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व त्यांना मिळाले होते. त्यांनी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी चीनमधील दोन विद्यापीठांमध्ये व्याख्यान दिले होते. यानंतर ते घरी परण्यास निघाले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. १ मे २०२५ रोजी त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठोठावण्यात आले. चीनच्या गुप्त अणुचाचण्यांवर पाळत ठेवल्याचा खोटा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला.
त्यांची आतापर्यंत १०० वेळा चौकशी करण्यात आली असून त्यांना खासगी वकिलांशी संपर्क करुन देण्यात आलेला नाही. तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी देखील कोणताही संपर्क झालेला नाही. चेन यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉलची समस्या आहे.
चेन यांनी अमेरिकेच्या अर्थसहाय्याने अनेक मोठ्या वैज्ञानिक प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांनी आशियतील अणुचाचण्यांचा शोध घेण्याचे मुख्य काम केले. विशेष करुन उत्तर कोरियाच्या अणुचाचण्यांवर व्यापक आणि महत्त्वपूर्ण संशोधने केले आहे. यामुळेच चीनने अमेरिकेच्या अणुचाचण्यांविषयी त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी त्यांना ताब्यात ठेवल्याचा आरोप केला जात आहे. तसेच त्यांच्या मदतीने स्वत:च्या अणुचाचण्या कशा लपवता येतील याचे तंत्रज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न चीन करत आहे.
यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने, त्यांची न्यायसंस्था कायद्यानुसारच काम करेत. चुकीच्या पद्धतीने कोणालाही ताब्यात ठेवण्यात आलेले नाबी. तसेच हेरगिरीच्या गुन्ह्यांसाठी चीनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी यूलिन चेन यांच्या सुटकेची चीनकडे मागणी केली आहे. याशिवाय इतर १२ नागरिकांनाही चीनने ताब्यात घेतले असून त्यांच्या सुटकेची मागणी केली जात आहे. या प्रकरणामुळे सध्या अमेरिका आणि चीनमधील तणाव प्रचंड वाढण्याची शक्यता आहे.
Sheikh Hasina मायदेशी परतणार, पण पुढे काय? बांगलादेशकडून मृत्यूदंडाबाबत मोठे संकेत






