Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता

US Visa Investigations : अमेरिकेत h-1b व्हिसाच्या कथित गैरवापराच्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यामध्ये दिग्गज कंपनी कॉग्निझंटचे नाव समोर आल्याने भारतीय आयटी व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे. याचा सर्वाधिक परिणाम भारतीयांवर होण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2026 | 03:29 PM
US Visa Investigations

US Visa Investigations

Follow Us
Follow Us:
  • भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात?
  • H-1B व्हिसा फ्रॉडची चौकशी सुरु
  • IT कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण
US Visa Investigations : वॉशिंग्टन : भारतीयांच्या अमेरिकन स्वप्नावर पुन्हा संकट उभारले आहे. अमेरिकेने व्हिसाच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. यामध्ये आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी कॉग्निझंटचे नाव समोर आल्याने भारतीय आयटी व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, कंपनीने आरोप फेटाळले असून सध्या चौकशी सुरु असल्याचे सांगितले. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात.

Trump Assassination Plot : ट्रम्प यांच्या जीवाला धोका? अमेरिकेच्या इराणवर हल्ल्यामागचं खरं कारण आलं समोर; जाणून घ्या इनसाइड स्टोरी

काय आहे नेमकं प्रकरण?

H-1B व्हिसा हा अमेरिकेतील विशेष कौशल्य असलेल्या परदेशी व्यावसायिकांसाठी एक वर्क व्हिसा आहे. भारतातील हजारो आयटी इंजिनियर्स आणि आयटी कर्मचारी या व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेत नोकरीला जातात. यामुळे व्हिसाशी संबंधित कोणतीही कारवाई भारतीयांवर परिणाम करु शकते.

अमेरिकेच्या न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही कंपन्यांनी H-1B व्हिसा प्रक्रियेतील नियमांचे पालन न केल्याचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे संबंधित कंपन्यांची चौकशी सुरु आहे. तपासात गैरव्यवहार सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्यात येऊ शकते. दंड, भविष्यात व्हिसा प्रायोतकत्वावर निर्बंध किंवा इतर कायदेशीर कारवाई होऊ शकते. सध्या या अंतर्गत दिग्गज कंपनी कॉग्निझंटचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्याचा व्हिसा आपोआप रद्द होत नाही. परंतु एखाद्या कंपनीवर कारवाई झाल्यास कर्मचाऱ्यांना नवीन नियोक्त शोधावा लागतो. तर काहींना अमेरिकेत राहण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करावा लागतो. व्हिसा फसवणुकीत कागदोपत्री असलेली माहिती, पण प्रत्यक्षात व्यवसाय नसलेल्या कंपन्यांचा वापर केला जातो. अशा कंपन्या बनावट  नोकरीची ऑफर देऊन अर्जदाराकडून मोठी रक्कम वसूल करतात. अमेरिकेकडून यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात आली आहे.

भारताची ही बाब का महत्त्वाची?

अमेरिकेत H-1B व्हिसावर राहणाऱ्या भारतीयांची संख्या अधिक आहे. यामुळे व्हिसा नियम अधिक कठोर झाल्यास त्याचा परिणाम अमेरिकत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांवर होऊ शकतो. यामुळे अमेरिकेत नोकरी किंवा करिअर करु इच्छिणाऱ्या कोणत्याही एजंट किंवा सल्लागाराच्या अवास्तव अश्वासनांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. सर्व व्हिसा प्रक्रियेची मागिती अधिकृत स्रोतांवरुन घ्यावी. कागदपत्रांचिी योग्य पडताळणी करावी आणि केवळ अधिकृत एजंटच्या माधमातूनच अर्ज करावा असे आवाहन सरकारने केले आहे. नियमांचे पालन करुन केलेला अर्जच भविष्यात सुरक्षित आणि विश्वासार्ह ठरेल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

अर्जेंटिनात फ्लाइट इन्स्ट्रक्टरची उडत्या विमानातून उडी; ट्रेनी पायलटचा गोंधळ उडाला अन्…; जाणून घ्या पुढं काय घडलं?

Web Title: Us visa investigations h1b visa fraud cognizant indian it workers american dream

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • America
  • H-1B Visa
  • Illegal immigration
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.