Photo Credit- Social Media बनायचं होतं डॉक्टर, झाल्या आंतराळवीर...; कसं होतं सुनीता विल्यम्सचं आयुष्य?
Sunita Williams Story: आंतरळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर जगभराती आनंदाचे वातावरण आहे. सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळ प्रवासाला गेल्या होत्या आणि यावेळी त्या सर्वात जास्त वेळ अंतराळात चालणारी महिला ठरल्या आहेत. अंतराळात मॅरेथॉन धावणारी जगातील पहिली अंतराळवीर म्हणूनही सुनीता विल्यम्य प्रसिद्ध आहेत. सुनीता विल्यम्स यांच्या या मोहिमेमुळे जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सगळ्यात सुनीता विल्यम्य यांच्या जीवनाबाबत जाणून घेण्याची अनेकजण उत्सुक आहेत.
सुनीता विल्यम्सच्या वडिलांचे नाव दीपक पंड्या आहे. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन गावातील रहिवासी दीपकने अहमदाबादमधून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर ते थेट अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी स्लोव्हेनियन वंशाच्या एका महिलेशी लग्न केल. दीपक पंड्या यांच्या घरी सुनीता विल्यम्स यांचा जन्म झाला. बालपणी सुनीता यांना प्राण्यांची खूप आवड होती आणि या आवडीमुळेच त्यांनी प्राण्यांची डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी अर्जही केला होता, पण पण त्यांना आवडीच्या कॉलेज प्रवेश मिळू शकला नाही.
त्यानंतर १९८३ मध्ये त्यांनी यूएस नेव्हल अकादमीमध्ये सामील झाल्या आणि १९८७ मध्ये त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी मिळवली, जी त्यांच्या यशाची पहिली पायरी ठरली. नौदल अकादमीतील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले आणि विविध प्रकारची विमाने उडवली. दरम्यान, एके दिवशी त्यांना जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये जाण्याची संधी मिळाली. या संधीमुळे त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली. तिथे त्यांची भेट अंतराळवीर जॉन यंग यांच्याशी झाली. जॉन यंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारा नववा मानव होते. जॉन यंग यांच्या भेटीमुळे सुनीता इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी अंतराळवीर होण्याचा निर्णय घेतला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉन यंगला भेटल्यानंतर सुनीता विल्यम्सने अंतराळवीर होण्यासाठी नासाकडे अर्ज केला, परंतु तिथेही त्यांच्या अर्ज नाकारण्यात आला. यानंतर, १९९५ मध्ये, त्यांनी फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि पुन्हा नासाकडे अर्ज केला. यावेळी त्यांची निवड झाली. पण त्यानंतरही त्यांना अंतराळात जाण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागली. सुमारे ८ वर्षांनंतर, २००६ मध्ये, त्यांना अंतराळात जाण्याची संधी मिळाली.