दुबई मरीना इमारतीला भयंकर आग (फोटो सौजन्य - X.com)
दुबई मरीना येथील ६७ मजली उंच इमारतीत भीषण आग लागली. आग वेगाने पसरू लागली तेव्हा वरच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना हेदेखील माहीत नव्हते की ते राहत असलेल्या इमारतीला आग लागली आहे. अलार्म वाजत नसल्याने लोकांना याबाबत कळले नाही मात्र जेव्हा त्यांना हे कळले तेव्हा खूप उशीर झाला होता.
असे असतानाही या आगीच्या घटनेमुळे ४००० लोकांना व्यवस्थितरित्या कोणतीही जीवितहानी न होता रेस्क्यू करण्यात आल्याचे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर येत आहे. आगीच्या घटनेनंतर गोंधळ उडाला होता. इमारतीत राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की अग्निशमन अलार्म काम करत नव्हते, त्यामुळे त्यांना त्याबद्दल माहिती नव्हती. त्यांना धूर दिसला किंवा त्यांच्या मित्रांनी आणि शेजाऱ्यांनी फोन करून माहिती दिली तेव्हाच त्यांना कळले आणि त्यानंतर त्यांनी त्वरीत धावाधाव केली (फोटो सौजन्य – X.com)
रुग्णालयात भरती
अहवालानुसार, इमारतीत राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की पायऱ्या धुराने भरलेल्या होत्या, ज्यामुळे आगीसारख्या परिस्थितीतही लोकांना लिफ्टमधून बाहेर पडावे लागले. मोठ्या संख्येने लोकांना वाचवण्यात आले आणि त्यानंतर ते सर्वजण रात्रभर बाहेरच राहिले. वाचवलेल्या अनेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले असल्याची माहिती आता समोर येत आहे.
Russia Earthquake: रशियातील कुरिल बेटांवर 6.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप; परिसरात भीतीचे वातावरण
रहिवाशांना वाचविण्यात यश
तथापि, या मोठ्या आगीनंतरही, दुबई सिव्हिल डिफेन्स टीमने ७६४ फ्लॅटमधील सर्व ३,८२० रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेत कोणत्याही प्राण्यालादेखील इजा झाली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की वेळेवर उचललेल्या योग्य पावलांमुळे आणि मदत आणि बचाव कार्यामुळे फारसे नुकसान झाले नाही, अन्यथा आजूबाजूच्या इमारतींनाही याचा फटका बसला असता.
सकाळी ११:३० वाजेपर्यंत आग आटोक्यात आली होती, परंतु आगीचे कारण अद्याप कळलेले नाही. एजन्सी आगीच्या कारणाचा तपास करत आहेत. आगीनंतर दुबई मरीना स्टेशन (क्रमांक ५) आणि पाम जुमेरा स्टेशन (क्रमांक ९) दरम्यानची ट्राम सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
हजपूर्वी सौदी सरकारकडून मोठा दिलासा; भारतीय कामगारांसाठी ‘Work Visa Ban’ मागे
पहा महाभयंकर आगीचा व्हिडिओ
Fire breaks out in Dubai Marina building; evacuation and containment efforts underway
Residents are evacuated as firefighters battle the blaze overnighthttps://t.co/WLe0Pk1sMa pic.twitter.com/fM2iDWalfH
— Gulf News (@gulf_news) June 13, 2025
आगीचा परिणाम दाखवणारा व्हिडिओ
The #fire has been going on for hours. I hope everyone living in the building and the area is alright. It’s in #Dubai Marina. pic.twitter.com/j4hlQRYmBG
— Juhri Selamet (@juhriSL) June 14, 2025
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
More than 3,800 residents were safely evacuated after a major fire broke out in Tiger Tower, also known as Marina Pinnacle, in Dubai Marina on Friday night. pic.twitter.com/B9rZPR0FNX
— The National (@TheNationalNews) June 14, 2025