नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष यावेळी बहुमताचा आकडा गाठताना दिसत नाही. यावेळी आम आदमी पार्टी (आप) सर्वात मोठा पक्ष बनू शकेल, परंतु स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 59 जागा जिंकतील असे दिसत नाही.
पंजाब विधानसभेच्या 117 जागांपैकी AAP 38 ते 44 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनू शकतो. 30 ते 39 जागांसह अकाली दल-बसपा युती दुसऱ्या क्रमांकावर राहू शकते. या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे. मात्र यामुळे आप हा पक्ष आता फक्त दिल्ली पुरता मर्यादीत न राहता राष्ट्रीय पक्षाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली 77 जागा जिंकून 2017 मध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळवणाऱ्या काँग्रेसला यावेळी केवळ 26 ते 32 जागा मिळण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत भाजप क्वचितच चमत्कार दाखवू शकेल. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) आणि सुखदेवसिंग धिंडसा यांच्या शिरोमणी अकाली दल (युनायटेड) यांच्याशी युती करून निवडणुकीत उतरलेल्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना 7-10 जागा मिळू शकतात. 1 ते 2 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.
यावेळी पंजाबमध्ये बहुकोर लढतीमुळे ३० हून अधिक जागांवर विजयाचे अंतर खूपच कमी असेल. या जागांवर विजयी फरक 3 हजारांपेक्षा कमी असू शकतो. शेतकरी आंदोलन चालवणाऱ्या नेत्यांना पंजाबचा मतदार सर्वात मोठा धक्का देणार आहे. शेतकरी संघटनांच्या संयुक्त समाज मोर्चाचे (एसएसएम) खातेही उघडले जात नाही.