पणजी : भाजपने आज गोवा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला. या जाहीरनाम्यात गोवेकरांसाठी आश्वासने भाजपने दिली आहेत. मागच्या १० वर्षात भाजपने सुरू केलेली कामे पूर्ण करण्यासाठी तसेच गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवेकरांकडे केली आहे. स्वयंपूर्ण गोव्यासाठी पुन्हा एकदा भाजपला निवडून देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.
मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली गोव्याला एक नवी दूरदृष्टी दिली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे गोव्याचा विकास अधिक झाला आहे. गोव्याला २५ हजार कोटी दिले आणि येणाऱ्या काळात १५ हजार कोटी देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गोव्यात रस्ते क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाला असून, टूरिझम क्षेत्रातही दुप्पट जॉब उपलब्ध होतील अशी माहिती गडकरी यांनी दिली.
जाहीरनाम्यातील आश्वासने