देशातील सगळ्यात छोटे राज्य असलेल्या गोवा (Goa) राज्यामध्ये सांकेलिम मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant’s Victory For The Third Time) तिसऱ्यांदा जिंकले आहेत. विजय मिळाल्यानंतर सावंत यांनी सांगितलं की, भाजप २० जागांवर (BJP Leading on 20 Seats) जिंकत आहे. आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीसोबत (MGP) सरकार स्थापन करणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आजच राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे.
[read_also content=”गोव्यात १९ जागांवर भाजपची सरशी, आजच सरकार स्थापन करण्यासाठी घेणार राज्यपालांची भेट https://www.navarashtra.com/election-results-2022/election-results-2022/bjp-to-set-government-in-goa-assembly-election-2022-nrsr-252511.html”]
गोव्यामध्ये भाजप १९ जागांवर आघाडीवर आहे. पणजी मतदारसंघामध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांचा पणजी मतदारसंघातून ८०० मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे अतानिसोयो मोन्सरात उर्फ बाबुश मोन्सरात विजयी झाले आहेत. (Utpal Parrikar Losses Goa Election 2022) गोव्यामध्ये काँग्रेस १२, एमजीपी + ३ आणि आप २ जागांवर आघाडीवर आहे. अन्य उमेदवार ४ जागांवर आघाडीवर आहे.