गोव्यात (Goa Assembly Election 2022) शिवसेना आणि राष्ट्रवादी (Shivsena And Rashtrawadi Congress) काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा (Shivsena And Congress Got Less Votes Than Nota) पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला ०.२५% मत वाटा मिळालाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास १.०६% मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहे. १.१७% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे.
[read_also content=”उत्तरप्रदेशाच्या निकालाचे रहस्य १० प्रश्नांच्या उत्तरात! मायवतींची मते कशी पडली भाजपाच्या पारड्यात https://www.navarashtra.com/election-results-2022/election-results-2022/the-secret-of-uttar-pradeshs-result-in-answer-to-10-questions-how-mayawatis-opinion-fell-into-the-hands-of-bjp-nrvk-252724.html”]
दुसरीकडे भाजप २० जागांवर (BJP Leading on 20 Seats) जिंकत आहे. भाजप महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीसोबत (MGP) सरकार स्थापन करणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आजच राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. भाजपने गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर दिली होती.
दरम्यान गोव्यातील विजयावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Reaction On Victory In Goa Election) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, गोव्यातल्या लोकांनी आम्हाला स्पष्ट बहुमत दिलं आहे. आम्हाला २० किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल. लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अपक्ष उमेदवार आमच्यासोबत येणार आहेत. एमजीपी आमच्यासोबत युती करायला तयार आहे. आम्ही सरकार स्थापन करु . उत्पल पर्रिकरांच्या विरोधात उभे राहणारे बाबुश मोन्सरात जिंकणार हे पहिल्या दिवसापासून माहिती होतं, असंही त्यांनी नमूद केलं.