मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. त्यानंतर संध्याकाळी सर्व पाच राज्य अर्थात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीची एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. त्यात उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्ता कायम राखत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र, त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. दुसरीकडे पंजाबमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा झटका बसताना दिसतोय. तिथे आपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलद्वारे वर्तवण्यात आला आहे. असं असलं तरी काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील एक्झिट पोलचा दाखला देत मोठा दावा केला आहे.
एक एक्जिट पोल ये था। जब नतीजे आए तो बीजेपी को मात्र 77 सीटें मिली।
उत्तराखंड-पंजाब-गोवा और मणिपुर में हम सरकार पूर्ण बहुमत से सरकार बनाएंगे।
नेता और पार्टी कार्यकर्ता ईमानदारी से काउंटिंग करवाने में लग जाएं। #ExitPoll pic.twitter.com/bPPgHsELD3
— Dr. Nitin Raut ?? (@NitinRaut_INC) March 7, 2022
‘एक एक्झिट पोल असा होता. जेव्हा निकाल लागला तेव्हा भाजपला केवळ ७७ जागा मिळाल्या. उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये आम्ही पूर्ण बहुमताने सरकार बनवणार. नेते आणि पक्ष कार्यकर्ते इमानदारीने मतमोजणीच्या कामात लागले आहेत’, असं ट्विट नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसण्याचा अंदाजही नितीन राऊत यांनी फेटाळून लावला आहे.