Gram Panchayat Member Assaulted Gram Sevak Case Registered At Kusvali In Maval Nrab
ग्रामपंचायत सदस्याने केली ग्रामसेवकाला मारहाण ; मावळातील कुसवली येथील प्रकार, गुन्हा दाखल
मावळ तालुक्यातील कुसवली ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक यांना दमदाटी करून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मावळ तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील कुसवली ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक यांना दमदाटी करून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मावळ तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामसेवक अतुल देवराम रावते यांनी तक्रार दिली आहे.तर, ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ दशरथ भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत सदस्य भालेराव यांनी कुसवली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन ग्रामसेवक रावते हे शासकीय मृत्यू नोंदणीचे काम करीत असताना तुम्ही माझे कोणतेच काम करित नाही, ग्रामपंचायतीची कामे मला विश्वासात न घेता करता व तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार करता, तुम्ही तुमच्या लोकांची कामे करता माझी कामे करीत नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच, शासकीय काम करण्यापासून रोखून हाताने व खुर्ची फेकून मारहाण केली. त्यामुळे ग्रामसेवक यांच्या डाव्या कानाला दुखापत झाली आहे.झालेल्या तालुक्यातील ग्रामसेवकांनी दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच, पोलिस निरीक्षक कुमार कदम यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली.
Web Title: Gram panchayat member assaulted gram sevak case registered at kusvali in maval nrab