जेजुरी : पुरंदर तालुक्यातून सध्या अनेक कार्यकर्ते भाजपा पक्षात प्रवेश करत असून काही इच्छुकही येत्या महिन्यात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करणार असल्याचे चित्र भाजपाचे पुरंदर हवेली निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव यांच्या निवास स्थानी दिसून आले आहे .
जेजुरीच्या खंडोबा गडावरील घडशी, गुरव, कोळी समाजाच्या काही तरुणांनी बाबाराजे जाधवराव, कार्यकारणी सदस्य सचिन पेशवे, निलेश जगताप, गिरीश जगताप, कोल्हापूर प्रभारी अलका शिंदे, तालुका अध्यक्ष गणेश भोसले, जेजुरी अध्यक्ष महेश राऊत यांच्या उपस्तितीत पुरंदर भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. यावेळी भाजपाचे जेजुरी शहर चिटणीस विक्रम माळवदकर , निलेश मोरे, विजय भोसले, माधुरी मोरे, गणेश मोरे, महिलाध्यक्षा उमा कुंटे, मंगल पवार, तालुक्यात पूर्वी या पक्षात अल्प कार्यकर्त्यांचा समावेश होता.