ओकिनावातर्फे इलेक्ट्रिक दुचाकी श्रेणीवर उत्सवी ऑफर्सची घोषणा
मुंबई : ओकिनावा या मेक इन इंडियावर फोकस असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने यंदाच्या हंगामामध्ये त्यांच्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. ग्राहकांसाठी उत्सवी आनंदाला उच्च स्तरावर घेऊन जात ओकिनावाने लकी ड्रॉचे अनावरण केले आहे. या ड्रॉच्या माध्यमातून जवळपास १० ग्राहकांना लकी गिफ्ट्स मिळतील, तसेच पहिल्या भाग्यवान ग्राहकाला लोकप्रिय ओकिनावा स्लो स्पीड स्कूटर – आर३० घरी घेऊन जाण्याची संधी मिळेल. ही ऑफर उत्सवी हंगामादरम्यान वैध असून १५ नोव्हेंबर २०२०ला समाप्त होईल. लकी ड्रॉची घोषणा ३० नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात येईल.
प्रत्येक ग्राहकासोबत उत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी ब्रँडने प्रत्येक बुकिंगवर खात्रीदायी गिफ्ट्सची देखील घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना त्यांच्या ऑनलाइन व ऑफलाइन बुकिंग्जवर ६००० रूपयांचे एक गिफ्ट वाऊचर देखील मिळेल. ब्रँडने नुकतेच ग्राहकांच्या सोयीसुविधेसाठी त्यांच्या वेबसाइटच्या माध्यमातून वेईकल्सची ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू केली. ओकिनावाच्या डिजिटल व्यासपीठावर ग्राहक अनेक पर्यायांमधून कस्टम थीम पेंटेड स्कूटर्सची देखील निवड करू शकतात. व्यावसायिक आर्टिस्ट्सद्वारे उच्च दर्जाच्या पेंट्सचा उपयोग करत हातांनी या अद्वितीय थीम्स डिझाइन करण्यात आल्या आहेत.
[blockquote content=”महामारीमुळे ऑटोमोबाइलसह अनेक उद्योगक्षेत्रांमध्ये मंदीचे वातावरण होते. पण लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आम्हाला आमच्या ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता लोक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत प्रवासासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करत असताना ते ईव्हींना अधिक प्राधान्य देत आहेत. समाजामध्ये आयसीईमधून इव्हीमध्ये झालेला हा बदल मोठ्या कौतुकास पात्र आहे. ओकिनावाकडून सादर करण्यात आलेल्या ऑफर्सचा ग्राहकांसोबत तोच उत्साह साजरा करण्याचा मनसुबा आहे, जेथे आम्ही सहयोगाने प्रदूषण-मुक्त देशाच्या मोठ्या उद्देशाच्या दिशेने वाटचाल करत आहोत.” pic=”” name=”जीतेंदर शर्मा, व्यवस्थापकीय संचालक, ओकिनावा”]






