शाहूवाडी : दगड धोंड्यांनीच भरलेल्या माळरानावर बिऊर-शांतिनगर येथील प्रगतशील शेतकरी मानसिंग शिवाजी पाटील या शेतकऱ्यानं पावट्याचं हिरवं सोनं पिकवून सगळ्यांनाच थक्क केले आहे. आज जेव्हाहवामानात बदल, शेतीचावाढता खर्च, शेतकऱ्यांना हतबल करतआहे.अशा वेळेत मानसिंगपाटील व त्यांच्या पत्नी अनिता पाटील यादांपत्याने वडिलोपार्जित देशी बियाण्यांवरविश्वास ठेवून आपल्या रानामध्ये 30 गुंठेक्षेत्रात पावट्याची शेती केली आहे.
51 वर्षांपासून जपणूक केलेल्या पावट्याची बियाणे वापरून, आवश्यक औषध फवारणी व मेहनतीच्या जोरावर त्यांनी या माळरानावर पावट्याचा मळा फुलविला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या पावट्याची खोडणी सुरू होते. दररोज साधारण 40 ते 60 किलो 150 ते 180 रुपये दराने या पावट्याची विक्री होते.
मुळात हा देशी पावटा असल्याने हा विकायला त्यांना बाजारात जावे लागत नाही. खवय्ये थेट शेतावर जातात व ताज्या पावट्याची जागेवरच खरेदी करतात. यामधून या शेतकऱ्याला अवघ्या दोन महिन्यांत जवळपास तीन ते चार लाख रुपयांची कमाई होते. परंपरा, मेहनत व योग्य नियोजन यांची जर सांगड घातली तर माळरानातही सोनं पिकू शकतं. याचं हे उत्तम उदाहरण. डोंगररानात फुललेलं हे पावट्याचं हिरवं सोनं आज अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरतंय.






