फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आयपीएल 2026 चे मिनी ऑक्शन पार पडले आणि यामध्ये अनेक फेरबदल पाहायला मिळाले. चेन्नईच्या संघाने भारताचा अनुभवी अष्टपैलू रविद्र जडेजा याला बाहेर केले तर राजस्थान राॅयल्सने जडेजा ट्रेडिंगमध्ये विकत घेतले. त्याच्या जागेवर संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झाला आहे. आता राजस्थान राॅयल्सचा कर्णधार संजूला सीएसकेने विकत घेतल्यानंतर सोशल मिडियावर सध्या चर्चा सुरु आहे की राजस्थान राॅयल्सचा नवा कर्णधार कोण असणार आहे?
चेन्नई सुपर किंग्जमधून राजस्थान रॉयल्समध्ये सामील झालेला स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा लवकरच संघाचा नवा कर्णधार म्हणून निवडला जाण्याची शक्यता आहे. फ्रँचायझीने इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये हे संकेत दिले आहेत. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत हँडलवर रवींद्र जडेजाचा फोटो शेअर केला आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू हे त्याच्या जुन्या संघासोबत न खेळता नव्या सिझनमध्ये नव्या संघासह पाहायला मिळणार आहे.
आरआरने पोस्टरमध्ये तो आरआर जर्सी घातलेला, हातात तलवार धरलेला, महाराजा राजदंड धरल्यासारखा दिसत आहे. त्याने डोक्यावर पगडी घातली आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे, “पण मी लोकांना असे म्हणताना ऐकले आहे की मी जे काही करतो ते सुपर आहे.” “सुपर” या शब्दाच्या शेवटी एक अतिरिक्त “आर” जोडला आहे आणि आरआर संघाच्या जर्सीच्या रंगात, गुलाबी रंगात लिहिले आहे, बाकी सर्व मजकूर पांढऱ्या रंगात आहे.
रवींद्र जडेजाचे पोस्टर शेअर करताना, राजस्थान रॉयल्सने कॅप्शन दिले आहे, “लवकरच, थलापथी.” या स्टार अष्टपैलू खेळाडूला संघाची सूत्रे सोपवण्याचा हा एक मोठा संकेत म्हणून पाहिले जात आहे.
🔜 Thalapathy 🔥 pic.twitter.com/xPPX5z3Sco — Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 4, 2026
रवींद्र जडेजाने राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. २००८ मध्ये आरआरला पहिल्या आयपीएल हंगामात विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यावेळी महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न आरआरचा कर्णधार होता. जडेजाने २००८ आणि २००९ चे हंगाम राजस्थान रॉयल्सकडून खेळले. तो सर्वात जास्त काळ चेन्नई सुपर किंग्जसोबत आहे. २०२२ च्या आयपीएल हंगामात त्याने आठ सामन्यांमध्ये सीएसकेचे नेतृत्वही केले. आरआर आणि सीएसके व्यतिरिक्त, जडेजा गुजरात लायन्स आणि कोची टस्कर्स केरळकडूनही खेळला आहे. त्याच्याकडे २५४ आयपीएल सामन्यांमध्ये ३,२६० धावा आणि १७० विकेट्स आहेत.






