फोटो सौजन्य - Social Media
अशातच अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक खास GIF शेअर केला असून, त्यात तो ब्लॅक रंगाच्या स्टायलिश आउटफिटमध्ये अत्यंत प्रभावी दिसतो. कॅमेरा मागून पुढे येत त्याच्याकडे फिरतो आणि समोर असलेल्या एका भव्य गेटवर “Experience the Extraordinary” असे शब्द झळकतात. हे दृश्य पाहताच चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली असून, हा नेमका कशाचा संकेत आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
या पोस्टसोबत अल्लू अर्जुनने दिलेले कॅप्शनही तितकेच रहस्यमय आहे. कोणतेही थेट स्पष्टीकरण न देता, त्याने केवळ उत्सुकता वाढवणारे शब्द वापरले आहेत. त्यामुळे हा आगामी चित्रपटाचा टीझर आहे की एखाद्या भव्य पॅन-इंडिया प्रोजेक्टची पहिली झलक, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. काही चाहते हा दिग्दर्शक अॅटलीसोबतच्या संभाव्य बिग बजेट चित्रपटाचा इशारा असल्याचे म्हणत आहेत, तर काहींच्या मते हा पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा प्रयोग असू शकतो. दरम्यान, बॉक्स ऑफिसवरही अल्लू अर्जुनचे वर्चस्व कायम आहे. पुष्पा 2: द रूल या चित्रपटाने जगभरात सुमारे ₹1800 कोटींची लाइफटाइम कमाई करत नवा इतिहास रचला आहे. हा आकडा सध्या तरी कोणत्याही चित्रपटाला मोडता आलेला नाही. त्यामुळे अल्लू अर्जुन केवळ स्टारडमच्या नव्हे, तर बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीतही अव्वल स्थानावर आहे. हा विक्रम भविष्यात कोण मोडणार, याकडेही चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
अल्लू अर्जुन नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी वेगळं आणि मोठं घेऊन येतो. त्यामुळे “Experience the Extraordinary” हा फक्त एक डायलॉग नसून, त्याच्या पुढील प्रवासाचा संकेत असण्याची शक्यता अधिक आहे. भव्य स्केल, नवे प्रयोग, दमदार कथा आणि त्याची खास स्टाईल हे सगळं एकत्र आलं, तर प्रेक्षकांसाठी तो अनुभव खरंच ‘एक्स्ट्राऑर्डिनरी’ ठरेल.
आता अल्लू अर्जुन नेमकं काय घेऊन येणार, याची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे चाहत्यांची उत्सुक नजर लागून आहे. मात्र एक गोष्ट नक्की आयकॉन स्टारचा पुढचा प्रोजेक्ट मोठ्या पडद्यावर आला, तर तो भव्य, दमदार आणि चर्चेत राहणारा असणार, यात शंका नाही.






