फोटो सौजन्य: Social Media
बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे ही तिच्या अभिनय कौशल्यामुळे ओळखली जाते. तिने हिंदी सोबतच अनेक दाक्षिण्यात चित्रपटात सुद्धा काम केले आहे. त्यामुळेच तिचा चाहतावर्ग संपूर्ण देशभर पसरला आहे. नुकतेच अभिनेत्रीने एक नवीन लक्झरी कार खरेदी केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
पूजा हेगडेने आलिशान रेंज रोव्हर लक्झरी एसयूव्ही खरेदी केली आहे. या कारची किंमत 2.36 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 4.98 कोटी रुपयांपर्यंत जाते. आजकाल, रेंज रोव्हर ही बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय कार बनली आहे. अलीकडेच आलिया भट्टनेही ही आलिशान कार तिच्या घरी आणली होती. भारतातील इतर अनेक सुपरस्टार्सच्या कार कलेक्शनमध्ये या कारचा समावेश आहे. निम्रत कौर, रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर आणि तेलुगु चित्रपट अभिनेता महेश बाबूसह अनेक स्टार्सकडे ही कार आहे.
हे देखील वाचा: दिवाळीच्या मुहूर्तावर ‘ही’ 7 सीटर कार ठरत आहे सुपरहीट, किंमत फक्त 6 लाख
लँड रोव्हर रेंज रोव्हर भारतीय बाजारपेठेत चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे. या कारची एसई, एचएसई, ऑटोबायोग्राफी आणि फर्स्ट एडिशन बाजारात उपलब्ध आहे. ही कार तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच रेंज रोव्हरमध्ये 2-व्हीलबेस मॉडेलही देण्यात आले आहेत. पूजा हेगडेने रेंज रोव्हरचे कोणते व्हेरियंट खरेदी केले आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसानिमित्त ही कार खरेदी केली आहे.
रेंज रोव्हर SUV मध्ये 13.1-इंचाची फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. एक 13.7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील प्रदान केला आहे. उत्तम साउंड सिस्टीमसाठी या कारमध्ये 35 स्पीकर आहेत. लँड रोव्हरच्या या लक्झरी कारमध्ये मागील प्रवाशांसाठी 11.4-इंचाची मनोरंजन स्क्रीन देखील देण्यात आली आहे. या कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ, हवेशीर जागा, केबिन एअर प्युरिफायर आणि 3D सराउंड कॅमेरा सिस्टीम यांसारख्या अनेक उत्कृष्ट फीचर्सचा समावेश आहे.
हे देखील वाचा: दिवाळीत फटाक्यांपासून वाहनांचे कसे कराल संरक्षण? दुर्लक्ष केल्यास उडेल आगीचा भडका
लँड रोव्हरची ही लक्झरी एसयूव्ही तीन पर्यायांसह येते. ही कार 3.3-लिटर, 6-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे, जी 400 एचपी पॉवर प्रदान करते आणि 550 एनएम टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 3.0-लिटर, 6-सिलेंडर डिझेल इंजिनचा पर्याय देखील आहे, जो 350 hp पॉवर आणि 700 Nm टॉर्क निर्माण करतो.
रेंज रोव्हर कारचे सर्वात शक्तिशाली इंजिन 4.4-लिटर ट्विन-टर्बो V8 पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 530 hp ची शक्ती प्रदान करते आणि 750 Nm टॉर्क जनरेट करते. रेंज रोव्हरमधील सर्व इंजिन 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअर बॉक्ससह जोडलेले आहेत, ज्यामुळे कारच्या चारही चाकांना पॉवर मिळते.