फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या नवीन इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहक देखील पसंत करत आहे. येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे आज सर्वच वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रोडक्शनवर जास्त लक्षकेंद्रित करत आहे. आता कार्सपासून बाईक आणि स्कूटरपर्यंत सर्वच वाहने इलेक्ट्रिक होत आहे. आता बजाज कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लाँच करणार आहे.
बजाज ऑटो आपल्या उत्तम बाईक्स आणि स्कूटरसाठी ओळखली जाते. काही महिन्यांपूर्वीच कंपनीने जगातील पहिली सीएनजी बाईक मार्केटमध्ये आणली होती. ज्याला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आता कंपनी लवकरच भारतात आपली नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. कंपनी त्याची टेस्टिंगही करत आहे. ही नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 20 डिसेंबर 2024 रोजी लाँच होईल. अलीकडेच त्याचे टेस्टिंग मॉडेल स्पॉट झाले आहे. यादरम्यान, स्कूटरचे नवीन डिझाइन टेस्टिंग दरम्यान दिसून आले आहे.
मार्केटमध्ये नवीन E Scooter लाँच, फक्त 999 होईल बुकिंग, 1 KM चालवण्याचा खर्च फक्त 17 पैसे
या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नवीन कलर ऑप्शन्सस देखील दिले जाऊ शकते. यामध्ये स्मार्टफोनची कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशनही पाहता येईल. नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्टिंग मॉडेलमध्ये काय दिसले आहे ते जाणून घेऊया.
नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक बदल पाहायला मिळतील. नवीन चेतक फ्लोअरबोर्ड क्षेत्राखाली असलेल्या बॅटरीसह नवीन चेसिस वापरू शकते. यामुळे, त्याला पूर्वीपेक्षा जास्त बूट स्पेस मिळू शकते. यात मोठा अंडरसीट स्टोरेज देखील उपलब्ध असू शकतो. अलीकडे चेतकमध्ये 21 लिटर स्टोरेज कॅपॅसिटी देण्यात आली आहे.
Auto X च्या अहवालानुसार, या स्कूटरच्या दोन्ही टोकांना स्टीलची चाके आणि ड्रम ब्रेक्स देखील आहेत. परंतु, त्यास लॉक करण्यायोग्य ग्लोव्ह बॉक्स मिळत नाही, जो सध्याच्या मॉडेलमध्ये समोरच्या ऍप्रनच्या मागे दिला जातो. त्यात कीलेस इग्निशन सिस्टीमही दिसत नाही.
Second Hand आणि Electric Cars महागण्याची शक्यता, GST दर 12 वरून 18 टक्के करण्याचा विचार
नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नवीन बॅटरी पॅक दिसू शकतो, जो संभाव्यपणे त्याची रेंज वाढवू शकतो. यासोबतच हे सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक क्षमतेसह येऊ शकते. ऑटो एक्सने दिलेल्या अहवालानुसार त्याच्या नवीन व्हर्जनमुळे स्कूटरची रेंज वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरवर लांबचा प्रवास करता येईल.
नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सध्याच्या स्कूटरपेक्षा जास्त असू शकते. अलीकडे, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या बजाज चेतकची किंमत 95,998 रुपयांपासून सुरू होते आणि 1.29 लाख रुपयांपर्यंत जाते. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.