फोटो सौजन्य: Gemini
ओकिनावा प्रेज प्रो ही शहरी वापरासाठी डिझाइन केलेली इलेक्ट्रिक स्कूटर असून स्टाइल आणि परफॉर्मन्सचा उत्तम कॉम्बिनेशन आहे. यात 2.7 kW क्षमतेचा BLDC मोटर देण्यात आले आहे, जे 2.08 kWh डिटॅचेबल लिथियम-आयन बॅटरीवर चालते. ही स्कूटर 56 किमी/ता. टॉप स्पीड देते आणि एका चार्जवर सुमारे 81 किमीपर्यंत रेंज देते. हे स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी अंदाजे 2 ते 3 तास लागतात. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 84,443 रुपये आहे.
Hero Splendor ला मायलेजच्या बाबतीत अक्षरशः रडवते ‘ही’ बाईक! 1 लिटर पेट्रोलवर 65 किमीची अंतर करते पार
बजाज चेतक 3001 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 99,990 रुपये आहे. यात 3 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली असून ती एका चार्जमध्ये 127 किमीपर्यंत रेंज देते. आयकॉनिक रेट्रो चेतक डिझाइनला आधुनिक टच देत अलॉय व्हील्स, LED लाईटिंग आणि कलर TFT डिस्प्ले यांसारखी फीचर्स यात मिळतात. याशिवाय स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, हिल-होल्ड असिस्ट, रिव्हर्स मोड आणि कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टममुळे सुरक्षितता अधिक वाढते.
कायनेटिक ग्रीन जिंग बिग बी ही शहरातील रोजच्या वापरासाठी उपयुक्त आणि आकर्षक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 75,990 रुपये आहे. 1.7 kWh लिथियम-आयन बॅटरीमुळे ती 100 किमीपर्यंत रेंज देते. ही स्कूटर मॅजिक ब्लू, रोमँटिक रेड आणि रॉयल व्हाईट रंगांमध्ये उपलब्ध आहे.
जेलिओ एक्स मेन 2.0 ही किफायतशीर, आरामदायी आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यात 74V 45Ah लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली असून ती एका चार्जमध्ये सुमारे 120 किमीपर्यंत चालते. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 92,000 रुपये आहे. हलक्या वजनामुळे ट्रॅफिकमध्ये चालवणे सोपे जाते.
Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स
एम्पीयर मॅग्नस EX ही स्मार्ट आणि विश्वासार्ह इलेक्ट्रिक स्कूटर असून शहरातील दैनंदिन वापरासाठी योग्य आहे. ही एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून 80 ते 100 किमीपर्यंत रेंज देते. यात 2.3 kWh लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी देण्यात आली आहे, जी सुरक्षित आणि टिकाऊ मानली जाते. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 84,900 रुपये आहे. आरामदायी आणि दमदार परफॉर्मन्स हवे असणाऱ्यांसाठी ही चांगली निवड ठरते.






