फोटो सौजन्य: Social Media
देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ खूप मोठ्या प्रमाणत पाहायला मिळत आहे. आता फक्त शहरात नाही तर गावात सुद्धा इलेक्ट्रिक वाहनं रस्त्यावर फिरताना दिसत आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींना कंटाळून कित्येक ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे.
इलेक्ट्रिक दुचाकींना सुद्धा मार्केटमध्ये चांगली मागणी मिळत आहे. म्हणूनच भारतात अनेक इलेक्ट्रिक दुचाकी बनवणाऱ्या कंपन्या सुद्धा कार्यरत आहे. नुकतेच मार्केटमध्ये अशी एक धमाकेदार ई-स्कूटर लाँच झाली आहे, जी फक्त तुम्ही 999 रुपयात बुक करू शकता.
Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये भाग घेणार 34 वाहन उत्पादक कंपन्या, वाचा पूर्ण लिस्ट
Wardwizard Innovations and Mobility Limited ने बाजारात एक जबरदस्त स्कूटर लाँच केली आहे जी एक किलोमीटर चालण्यासाठी फक्त 17 पैसे इतका खर्च येतो. Joy Nemo इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. या ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. ही स्कूटर केवळ 999 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते.
जॉय निमो तीन रायडिंग मोडसह लाँच करण्यात आली आहे. या स्कूटरला इको, स्पोर्ट आणि हायपर मोडमध्ये चालवता येते. ही स्कूटर शहरी रस्त्यांवर चालवता येईल अशी तयार करण्यात आली आहे. जॉयची ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जिंगमध्ये 130 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा करते. यावरूनच समजते की ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्तात मस्त आहे.
जॉयच्या या ईव्हीमध्ये BLDC मोटर वापरण्यात आली आहे, ज्याची क्षमता 1500W आहे. यासोबतच 3-स्पीड मोटर कंट्रोलर देखील जोडण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर ताशी 65 किमी वेगाने चालवता येते. सिल्व्हर आणि व्हाईट कलर स्कीमसह जॉय निमो बाजारात आली आहे.
वर्षाअखेरीस EV खरेदी करणे झाले स्वस्त, ‘या’ कंपन्या देत आहेत आतापर्यंतचे बेस्ट डिस्काउंट
जॉय निमोमध्ये सस्पेंशनसाठी, समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल शॉक ॲब्जॉर्बर्स बसवण्यात आले आहेत. स्कूटरच्या दोन्ही चाकांसाठी हायड्रोलिक डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहेत. यासोबतच या ईव्हीमध्ये कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टीमही देण्यात आली आहे. यामुळे चालकांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही. तसेच त्याला एका उत्तम राइडचा अनुभव घेता येईल. या स्कूटरमध्ये एलईडीसह प्रोजेक्टर हेडलॅम्प आहेत. EV मध्ये 5-इंचाचा पूर्ण रंगीत TFT डिस्प्ले आहे.
जॉयच्या या ईव्हीमध्ये एक स्मार्ट कॅन-बॅटरी सिस्टम आहे, ज्याद्वारे अँड्रॉइड किंवा आय-फोन दोन्ही कनेक्ट केले जाऊ शकतात. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी USB पोर्ट देखील आहे. या EV मध्ये रिव्हर्स असिस्ट देखील प्रदान केले आहे, जे पार्किंगमध्ये पार्क केलेले वाहन बाहेर काढण्यास मदत करते. अशा अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज असणारी ही स्कूटर आता भारतीय मार्केटमध्ये लाँच झाली आहे.