फोटो सौजन्य: iStock
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एक पर्यावरणपूरक आणि स्वस्त किमतीच्या कार म्हणून यांच्याकडे पहिले जात आहे. त्यात इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर आणि कार्सना पहिले प्राधान्य देत आहेत. हीच वाढती मागणी पाहून, ऑटो कंपन्या बेस्ट फीचर्स आणि रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि सरकारी धोरणात्मक पाठिंब्यामुळे भारतात ईव्हीची मागणी झपाट्याने वाढत आहे. कमी बजेटमध्ये चांगली रेंज आणि फीचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार ग्राहकांची पहिली पहिली पसंत बनत आहेत.
चला तर मग आज आपण अशाच तीन परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत बेस्ट परफॉर्मन्स देतात. या यादीत आम्ही MG Comet EV, Tata Tiago EV आणि Tata Punch EV यांचा समावेश केला आहे.
भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल बोलायचे झाले तर, एमजी कॉमेट ईव्हीची सुरुवातीची किंमत 4.99 लाख रुपये आहे, तर तिची स्टॅंडर्ड किंमत 6.99 लाख रुपये आहे. यात 17.3 kWh बॅटरी आहे, जे ARAI-प्रमाणित 230 किमीची रेंज देते. 10.25-इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, ड्युअल एअरबॅग्ज आणि रिव्हर्स कॅमेरा यासारख्या फीचर्समुळे ही कार शहरी प्रवासासाठी एक कॉम्पॅक्ट आणि बजेट-फ्रेंडली ऑप्शन बनते.
देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कारपैकी एक कार म्हणजे टाटा टियागो ईव्ही. याची परवडणारी किंमत, चांगली रेंज आणि विश्वासार्ह परफॉर्मन्स यामुळे ही कार खास बनते. या कारची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे आणि त्यात 19.2 kWh (223 किमी रेंज) आणि 24 kWh (293 किमी रेंज) असे दोन बॅटरी पर्याय आहेत. यात 7 इंचाची टचस्क्रीन, हरमन साउंड सिस्टम, ड्युअल एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 58 मिनिटांत 80% पर्यंत फास्ट चार्जिंगची सुविधा आहे, ज्यामुळे चांगली रेंज असलेल्यांसाठी ही एक उत्तम ऑप्शन पर्याय बनते.
टाटा पंच ईव्ही ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे जी केवळ फीचर्समध्येच नाही तर सेफ्टी आणि रेंजमध्ये देखील चांगली कामगिरी करते. या मेड इन इंडिया ईव्हीला Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ही कार 9.99 लाख रुपयांपासून सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे आणि ती दोन बॅटरी व्हेरियंटसह येते.
जर तुम्हाला बजेट फ्रेंडली EV कार खरेदी करायची असेल तर MG Comet EV तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन ठरू शकते. त्याच वेळी, टाटा टियागो ईव्ही संतुलित रेंज आणि फीचर्स ऑफर करते. पण जर तुमचे बजेट 10 लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही एसयूव्हीसारखा अनुभव शोधत असाल, तर टाटा पंच ईव्ही हा बेस्ट पर्याय आहे.