भारतातील Best Budget Sports Bikes – तरुणांची पहिली पसंती
भारतात स्पोर्ट्स बाईक्सची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आकर्षक डिझाइन्स, पॉवरफुल इंजिन आणि रेसिंग फील यामुळे तरुणांमध्ये स्पोर्ट्स बाईक्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत. मात्र अनेक जणांना कमी बजेटमध्ये चांगली स्पोर्ट्स बाईक्स हवी असते. सध्या भारतीय बाजारात १ लाख ते २ लाखांच्या दरम्यान अनेक उत्तम स्पोर्ट्स बाईक्स उपलब्ध आहेत ज्या परफॉर्मन्स आणि मायलेज यांचा चांगला समतोल देतात.
भारतातील सर्वात लोकप्रिय बजेट स्पोर्ट्स बाईक्स पैकी एक म्हणजे Yamaha R15 V4. ही स्पोर्ट्स बाईक्स तिच्या अग्रेसिव्ह रेसिंग लुक आणि ऍडव्हान्स फीचर्स मुळे तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. 155cc इंजिन असलेली ही बाईक चांगला पिकअप आणि जवळपास 45 kmpl पर्यंत मायलेज देते. क्विक शिफ्टर, ड्युअल चॅनेल ABS आणि स्पोर्टी रायडींग पॉश्चर यामुळे ही बाईक ट्रॅक रायडींग चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
पॉवरफूल परफॉर्मन्स हवी असेल तर Bajaj Pulsar NS200 हा उत्तम पर्याय मानला जातो. 199cc इंजिन मुळे ही बाईक जोरदार ऍक्सलरेशन देते. हायवे राइड्स आणि लॉन्ग टुरिंगसाठीही ही बाईक चांगली मानली जाते. कमी बजेट मध्ये स्पोर्टी परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक्स मध्ये NS200 चे नाव नेहमी घेतले जाते.
Yamaha MT-15 ही बाईक स्पोर्टी लुक आणि दैनंदिन वापर यांचा उत्तम बॅलन्स देते. नेकेड स्ट्रीट फायटर डिजाईन मुळे ही बाईक शहरांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हलके वजन, चांगले हँडलिंग आणि ४५ ते ५० kmpl पर्यंत मायलेज ही तिची मोठी वैशिष्ट्ये आहेत. कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये MT-15 ची मोठी क्रेझ पाहायला मिळते.
TVS Apache RTR 200 4V ही बाईक फीचर्स आणि कम्फर्ट साठी ओळखली जाते. रायडींग मोड, डिजिटल डिस्प्ले आणि स्पोर्टी हँडलिंग यामुळे ही बाईक डेली रायडींग तसेच टुरिंग साठी चांगली मानली जाते. 197cc इंजिन असलेली ही बाईक परफॉर्मन्स आणि मायलेज यांचा उत्तम समतोल राखते.
जर स्पोर्टी लुक सोबत कम्फर्टेबल रायडींग हवे असेल तर Suzuki Gixxer SF 250 हा उत्तम पर्याय ठरू शकतो. 249cc इंजिंग असलेली ही बाईक स्मूथ परफॉर्मन्स आणि चांगली हायवे स्टॅबलिटी देते. लॉन्ग राइड्स करणाऱ्या रायडर्स मध्ये ही बाईक विशेष लोकप्रिय आहे.
भारतात बजेट स्पोर्ट्स बाईक्स सेगमेंट मध्ये अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. Yamaha R15 V4 रेसिंग फीलसाठी, Pulsar NS200 पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी, MT-15 स्टायलिश सिटी रायडींग साठी, Apache RTR 200 ऑल राउंड परफॉर्मन्ससाठी तर Gixxer SF 250 कम्फर्टेबल स्पोर्ट्स टुरिंगसाठी उत्तम मानल्या जातात. स्वतःच्या गरजेनुसार आणि बजेट नुसार योग्य बाईक निवडणे महत्त्वाचे ठरते.
Car Tyre Types : तुमच्या कारसाठी कोणता टायर योग्य? जाणून घ्या टायरचे प्रकार आणि फायदे






