फोटो सौजन्य: Social Media
लक्झरी कार म्हंटलं की अनेकांच्या नजरेसमोर नाव येतं ते बीएमडब्ल्यू कंपनीचे. या कंपनीने देशात आपली वेगळीच हवा निर्माण केली आहे. कंपनीच्या कार्स फक्त त्याच्या फीचर्समुळे नाही तर महागड्या किंमतीमुळे देखील ओळखल्या जातात.
बीएमडब्ल्यूच्या वाहनांची किंमत जरी जास्त असली तरी भारतात या वाहनांना चांगलीच मागणी आहे. म्हणूनच तर कंपनी देशात नवनवीन वाहनं लाँच करत असते. आता देशातील सर्वात मोठा ऑटोमोटिव्ह इव्हेंट सुरु झाला आहे. ज्याला भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 या नावाने ओळखले जात आहे. या ऑटो एक्स्पोमध्ये अनेक कंपन्या आपल्या आगामी कार लाँच करत आहे. BMW ने देखील आपली नवीन कार या ऑटो एक्स्पोमध्ये लाँच केली आहे.
काय लूक आहे राव ! Auto Expo 2025 मध्ये BMW S 1000 RR आणि R 1300 GSA झाल्या लाँच
ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये नवीन बीएमडब्ल्यू एक्स3 लाँच करण्यात आली आहे. ही चौथ्या जनरेशनची BMW X3 आहे. नवीन डिझाइनसोबतच, त्यात नवीन फीचर्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. या कारचे इंटिरिअर पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम आणि आलिशान बनवण्यात आले आहे. नवीन BMW X3 कोणत्या नवीन फीचर्ससह लाँच करण्यात आली त्याबद्दल जाणून घेऊया.
चौथ्या जनरेशनमधील BMW X3 ला नवीन डिझाइन देण्यात आले आहे. यात समोर एक मोठे ग्रिल आहे ज्यामध्ये होरिजेंटल आणि डायगोनल स्लॅट्स व एलईडी लाईट्स आहेत. त्याच वेळी, दोन्ही बाजूंना एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स समाविष्ट केले आहेत. नवीन BMW X3 मध्ये रुंद व्हील आर्च आणि 4 व्हील आकाराचे पर्याय देखील आहेत. मागून पाहिल्यावर ही कार खूपच स्पोर्टी दिसते. ज्यामध्ये एक लहान विंडशील्ड आणि नवीन टेल लाईट्स देखील देण्यात आले आहेत.
नवीन BMW X3 मध्ये नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच इन्फोटेनमेंट डिस्प्ले दिले आहे. यात एसी व्हेंट, इंटरॅक्शन बार आणि अॅम्बियंट लाइटिंग आहे. सेंटर कन्सोलमध्ये कॅमेरा, व्हॉल्यूम, नेव्हिगेशन आणि इतर फंक्शन्ससाठी गिअर नॉब आणि इतर बटणे आहेत. त्यातील स्टेअरिंग व्हील अगदी नवीन आहे. त्याचे केबिन पूर्णपणे रिसायकल केले गेले आहे. त्यात अपहोल्स्ट्री आणि पॅनोरॅमिक सनरूफ देखील आहे.
याला म्हणतात दर्जा ! Tata Avinya चा स्टायलिश लूक पाहून Mahindra BE 6 आणि XEV 9e ला विसराल
या कारमध्ये दिलेल्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, BMW X3 मध्ये २.०-लिटर चार-सिलेंडर इंजिन वापरले गेले आहे. त्याचे पेट्रोल इंजिन 206 बीएचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करते. तर डिझेल इंजिन 197 बीएचपीची पॉवर आणि 400 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिने आठ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेली आहेत.
नवीन BMW X3 पेट्रोल व्हर्जन 75,80,000 (एक्स-शोरूम)आणि डिझेल व्हर्जन 77,80,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. भारतीय बाजारपेठेत, ते मर्सिडीज-बेंझ GLC, ऑडी Q5 आणि व्होल्वो XC60 शी स्पर्धा करेल.