फोटो सौजन्य- Youtube
भारत महिंद्राची थार रॉक्स ही खूपच लोकप्रिय आहे. आजही ही थार रस्त्यावरून जाताना दिसली की अनेक जणांची नजर त्यावर खिळली जाते. तसेच कित्येक जण तर ही कार घेण्यासाठी आपल्या बजेटचे गणित मांडताना दिसतात. या एसयूव्ही कारचे डिझाईन आजही अनेकांच्या हृदयावर राज्य करत आहे. खासकरून तर तरुणांना या एसयूव्हीची जास्त भुरळ पडली आहे.
हे देखील वाचा: South Africa मध्ये लाँच झाली ‘ही’ मेड इन इंडिया कार, किमंत भारतापेक्षा जास्त
ही SUV चांगल्या परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते, मग ती शहरातील ड्रायव्हिंग असो किंवा ऑफ-रोडिंग. अलीकडेच महिंद्राने नवीन 5 डोअर थार लाँच केली आहे, जे पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि आकर्षक दिसत आहे. जर तुम्ही सुद्धा Mahindra Thar Roxx 5-Door खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर याबाबत तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी माहित असणे फार गरजेचे आहे.
थार रॉक्सच्या बेस व्हेरिएंट MX 1 रीअर व्हील ड्राइव्ह (पेट्रोल) मॉडेलची ऑन-रोड किंमत अंदाजे 15 लाख 21 हजार रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते. ही SUV खरेदी करण्यासाठी तुम्ही 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले, तर तुम्हाला उर्वरित रक्कम कर्ज म्हणून घ्यावे लागेल.
उदाहरणार्थ, जर तुम्ही ९.८ टक्के व्याजदराने ५ वर्षांसाठी लोन घेत असाल तर तुम्हाला EMI दरमहा २८ हजार रुपये भरावा लागेल. याशिवाय, महिंद्रा थार रॉक्स सुमारे 15 Kmpl मायलेज देते, ज्यामुळे तुम्हाला इंधनावरही खर्च करावा लागेल. या खर्चामुळे तुमचा एकूण खर्च वाढू शकतो. म्हणजेच एकंदरीत थार विकत घेतल्याने तुमच्या खिश्याला चांगलीच कात्री बसू शकते.
तुम्ही महिंद्रा थार रॉक्स घेण्याचा विचार करत असाल तर तुमचा पगार किमान 1 लाख रुपये तरी असला पाहिजे. याचे कर्ण म्हणजे जर तुम्ही मासिक हप्ता भरला तर तुमच्याकडे तुमच्या इतर खर्चासाठी देखील पैसे शिल्लक राहिले पाहिजेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा ईएमआय आणि इतर खर्च सहजपणे मॅनेज करू शकता. जर तुमचा पगार कमी असेल तर ही एसयूव्ही घेण्यापेक्षा तुमच्या बजेटमध्ये बसेल अशी कार विकत घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.