फोटो सौजन्य: Freepik
सध्या आपल्या देशात इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे. वाढती पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीला कंटाळले ग्राहक आता इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीकडे वळताना दिसत आहे. यामुळेच अनेक ऑटो कंपनीज सुद्धा येणाऱ्या काळात अनेक इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. तसेच सध्या सणासुदीचा काळ चालू झाला असल्याकारणाने अनेक ऑटो कंपनीज आपल्या कार्सवर बम्पर डिस्कॉउंट्स देत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या कार्सवर किती रुपयांची सूट मिळत आहे.
हे देखील वाचा: BYD eMAX 7 ची बुकिंग करणाऱ्या पहिल्या हजार ग्राहकांना मिळणार ‘हे’ स्पेशल गिफ्ट
टाटा मोटर्सच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक SUV पंच EV वर तुम्हाला 1.2 लाखांपर्यंत सूट मिळू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 14.29 लाख रुपयांपर्यंत जाते. या सवलतीत ही कार खरेदी करणे हा एक चांगला सौदा असू शकतो.
या सणासुदीच्या काळात Tata Nexon EV वरही मोठ्या ऑफर उपलब्ध आहेत. ग्राहकांना या कारवर 3 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे, जी डिस्काउंटनंतर ग्राहकांकडून अधिक प्रमाणात खरेदी केली जाऊ शकते.
हे देखील वाचा: टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली Royal Enfield Classic 650, जाणून घ्या फीचर्स
तुम्ही MG मोटरच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV ZS EV वर रोख सवलतकॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस समाविष्ट करून 3 लाखांपर्यंत बचत करू शकता. या कारची किंमत 18.98 लाख रुपयांपासून सुरू होते, आणि डिस्काउंटसह ती अगदी परवडण्याजोगी होऊ शकते.
तुम्ही Kia ची प्रीमियम इलेक्ट्रिक SUV EV6 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. कारण यावर तुम्हाला 15 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. Kia EV6 ची एक्स-शोरूम किंमत 60.97 लाख रुपयांपासून सुरू होते, ज्यामुळे ही सूट आणखी आकर्षक बनते.
BMW च्या लक्झरी इलेक्ट्रिक SUV IX1 वर 7 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. या लक्झरी कारची किंमत 66.90 लाख रुपये आहे. अशा प्रीमियम कारवर अशी सूट मिळणे ही एक उत्तम संधी असू शकते.
सणासुदीच्या काळात, या इलेक्ट्रिक कार्सवर उपलब्ध असलेल्या सवलतींसह तुम्ही तुमच्या आवडीची कार खरेदी करून चांगले फायदे मिळवू शकता.