फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र इतके मोठे आहे की इथे जगभरातून अनेक कंपनीज आपले वर्चस्व स्थापित करू पाहत आहे. ग्राहकांच्या कार्सकडून असणाऱ्या मागण्या सतत बदलत असतात ज्यामुळे ऑटो कंपनीज नेहमीच ग्राहकाच्या अपेक्षेनुसार मार्केटमध्ये कार्स आणताना दिसते. चिनी ऑटो कंपनी BYD सुद्धा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आपले पाय रोवू पाहत आहे. कंपनी लवकरच आपली नवीन कार भारत लाँच करणार आहे.
चीनी इलेक्ट्रिक कार उत्पादक BYD भारतात eMAX 7 लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतात येत्या 8 ऑक्टोबरला लॉन्च करणार आहे. ही कार लाँच करण्यापूर्वी कंपनीने तिचे बुकिंग सुरू केले आहे. तुम्ही जर ही कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही 51,000 रुपये टोकन रक्कम भरून त्याच्या अधिकृत डीलरशिप आणि BYD वेबसाइटवर ही कार बुक करू शकता.
हे देखील वाचा: टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली Royal Enfield Classic 650, जाणून घ्या फीचर्स
8 ऑक्टोबर 2024 पर्यंत नवीन eMAX 7 बुक करणाऱ्या आणि 25 मार्च 2025 पर्यंत डिलिव्हरी घेणाऱ्या पहिल्या एक हजार ग्राहकांना BYD एक विशेष डिस्काउंट देत आहे. या सर्वांसाठी बुकिंग किंमत 51,000 रुपये आहे. एवढेच नाही तर, BYD 7 kW पर्यंतचे मोफत चार्जर देखील या ग्राहकांना देणार आहे.
अद्याप BYD ने eMAX 7 ची फीचर्स भारतात उघड केलेली नाहीत, परंतु ती M6 नावाने जागतिक स्तरावर विकली जात आहे. डिझाईनच्या बाबतीत, हे सध्याच्या e6 सारखेच दिसते, नवीन एलईडी हेडलाइट्स आणि ग्रिल यामध्ये दिसू शकतात. नवीन अलॉय व्हील्स, नवीन डिझाईन केलेले बंपर आणि अपडेटेड एलईडी टेल लाईट सेटअप देखील मिळू शकतात.
या कारच्या इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर त्यात 6-सीटिंग लेआउट कॉन्फिगरेशन पाहिले जाऊ शकते. तसेच, ड्युअल-टोन केबिन थीम, अपडेटेड सेंटर कन्सोल आणि नवीन ड्राइव्ह मोड आणि अपडेटेड लेआउट देखील पाहता येईल. इतकेच नाही तर 12.8-इंचाची फिरणारी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि हवेशीर फ्रंट सीट्स देखील असू शकतात.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या कारमध्ये सहा एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, लेव्हल-2 ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS), ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सारखे सेफ्टी फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहे.
BYD eMAX 7 ची किंमत e6 पेक्षा जास्त असू शकते. त्याची एक्स-शोरूम किंमत 29.15 लाख रुपये असू शकते. भारतात ही कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टा सारख्या कार्सशी स्पर्धा करताना दिसणार आहे.