फोटो सौजन्य: YouTube
भारतात कार्सपेक्षा जास्त चर्चा बाईक्सच्या होत असतात. त्यातही जर बाईक्स कारपेक्षा महाग असेल तर अनेक जाणं या बाईकबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होतात. सध्या भारतात ज्याप्रमाणे नवीन कार्स लाँच होत आहे त्याच प्रमाणे वेगवेगळ्या बाईक्ससुद्धा लाँच होत आहे. नुकतेच दुकटी ही बाईक निर्माती कंपनीसुद्धा आता भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात उतरण्यास सज्ज झाली आहे.
डुकाटीने आपली नवीन बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. Multistrada V4 RS असे या बाजारात दाखल झालेल्या बाईकचे नाव आहे. मल्टीस्ट्राडाची ही आतापर्यंतची सर्वात महागडी बाईक आहे. Multistrada V4 RS ची एक्स-शोरूम किंमत 38,40,600 रुपये आहे. Ducati या बाईकची डिलिव्हरी सप्टेंबर महिन्यात सुरू करू शकते असा अंदाज आहे.
हे देखील वाचा: सोशल मीडियावर लोकप्रिय असणारे अनिरुद्धाचार्य महाराज आहे ‘या’ महागड्या कारचे मालक
Ducati Multistrada V4 RS मध्ये 1,103 cc Desmosedici Stradale V4 इंजिन आहे. या इंजिनसह ही बाईक या सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल बाइक बनली आहे. या डुकाटी बाईकमध्ये बसवलेले इंजिन 12,250 rpm वर 177 bhp ची पॉवर देते आणि 9,500 rpm वर 118 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकच्या RS व्हेरियंटमध्ये एक्रापोविर एक्झॉस्ट सिस्टीम बसवण्यात आली आहे.
वर नमूद केल्याप्रमाणे या बाईकची एक्स-शोरूम किंमत 38,40,600 रुपये आहे. जर आपण भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय कारबद्दल बोललो तर कित्येक जणं 40 लाख रुपयांच्या रेंजमध्ये टोयोटा फॉर्च्युनर खरेदी करू करताना दिसतात. टोयोटा फॉर्च्युनरची एक्स-शोरूम किंमत 33.43 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 51.44 लाख रुपयांपर्यंत जाते. चला जाणून घेऊया या 40 लाख रुपयांच्या बाईकमध्ये अजून काय खास आहे.
40 लाखांच्या रेंजमधील डुकाटीच्या बाईक्स टायटॅनियम नायट्राइड कोटिंगसह पूर्णपणे अॅडजस्टेबल करण्यायोग्य 48 मिमी ओहलिन्स फ्रंट फोर्क्ससह येतात. Multistrada V4 RS मध्ये 17-इंचाची बनावट ॲल्युमिनियम व्हील्स वापरली गेली आहेत. या बाईकमध्ये लावलेल्या सबफ्रेममुळे मल्टीस्ट्राडा व्हेरियंटच्या तुलनेत या बाइकचे वजन २.५ किलोने कमी झाले आहे.
या डुकाटी बाईकमध्ये फ्रंट आणि रिअर रडार तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, जे अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन फंक्शन अॅक्टिव्हेट करते. ही बाईक फुल पॉवर मोड आणि रेस रायडिंग मोडसह येते.